• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

हर घर तिरंगा अभियानांतर्गत जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप!

ByND NEWS INIDIA

Aug 12, 2022

हर घर तिरंगा अभियानांतर्गत जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप!

महाविद्यालयाच्या वतीने तिरंगा ध्वजासहित विद्यार्थ्यांनी रॅली काढून घरोघरी तिरंगा फडकवण्याचे केले आवाहन!

तिरंगा ध्वज ही देशाची अस्मिता—प्राचार्य डॉ.बी.डी.मुंडे

परळी वैजनाथ /प्रतिनिधी

परळी तालुक्यातील जवाहरलाल नेहरू वरिष्ठ महाविद्यालयाच्या अंतर्गत हर घर तिरंगा अभियान राबवून शहरात विद्यार्थ्यांनी रॅली काढून तिरंगा ध्वज फडकवण्याचे नागरिकांना आवाहन केले तसेच तिरंगा ध्वज ही देशाची अस्मिता आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.डी.मुंडे यांनी केले.

शासनाच्या परिपत्रकानुसार 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट रोजी भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा घरोघरी लावण्याचे आवाहन करण्यात आले त्यात जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते डॉ.बी.डी.मुंडे यांच्या हस्ते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले तसेच शहरात तिरंगा ध्वज फडकवण्याचे आणि राष्ट्रीय ध्वजा बाबत रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा सचिन डहाळे ,प्रा. दिनकर नागरगोजे, प्रा.संदीप कदम ,प्रा. संदिपान मुंडे, अमर चव्हाण ,नागनाथ साबणे , विकास गीते, ब्रह्मनाथ कांबळे ,गोविंद नागरगोजे आदीसह महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.