• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

डॉ. जाकीर हुसेन उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांची ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत जनजागृती रॅली*

ByND NEWS INIDIA

Aug 11, 2022

*डॉ. जाकीर हुसेन उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांची ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत जनजागृती रॅली

आज दि:11:08:2022 रोजी परळी येथील डॉ. झाकीर हुसेन एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. झाकीर हुसेन उर्दू शाळे तर्फे ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ‘अंतर्गत विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. भारत देश यावर्षी स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सव साजरा करणार असून परळी शहरातील व बीड जिल्ह्यातील ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन संस्थेचे अध्यक्ष हाजी वाहजुद्दीन मुल्ला यांनी केलं आहे. याच अनुषंगाने शाळेने परळी शहरातील नागरिकांची जनजागृती करण्याच्या हेतूने, विद्यार्थ्यांची प्रभात फेरी आयोजित केली. या प्रभातफेरीची सुरुवात आयशा कॉलनी, मोहम्मदया कॉलनी, बंगला, जामा मस्जिद, आंबे बेस, तळ आणि टॉवर, टॉवर पशी संस्थेचे अध्यक्ष हाजी वाहजेद्दीन मूल्ला, उप तहसीलदार रुपनर साहेब, पी. आय.ठाकूर साहब, शिंदे साहेब पेशकार,महादेव इट के, अश्विन मोगरकर आदींची उपस्थित होती मान्यवरां चे संस्थेचे अध्यक्ष हाजी वाहजेद्दीन मुल्ला यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा महत्वाचा हेतू हा लोकांनी त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा असा आहे. ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांनी आपआपल्या घरांवर तिरंगा फडकवावा, या हेतूने शाळेने ही जनजागृती मोहीम सुरु केली असून या माध्यमातून देशभक्तीची भावना जागृत करण्याचा शाळेचा प्रयत्न आहे. या प्रभातफेरीत मान्यवरांनी व तसेच विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सर्वांनी नागरिकांना दि. १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घरोघरी तिरंगा ध्वज फडकावावा, असे आवाहनही केले. याच अनुषंगाने या प्रभातफेरीमध्ये शाळेतील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून देशभक्तीची भावना दाखवली.
या जनजागृती रॅलीमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांनी ‘ चला भारत गीते गाऊ घरोघरी तिरंगा पाहू ’ ‘शहीदो को करो याद! हर घर तिरंगा रहे आबाद!! जात पात के बंधन तोडे, तिरंगा हम सब को जोडे, साथी सब हात बढाना, तिरंगा हर घरपर फ हराणा, जस्ने आजादी मनाना है! हर घर तिरंगा लहराना है!! आदी घोषणा दिल्या.
याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष श्री.हाजी वाहजुद्दीन मुल्ला, नायब तहसीलदार रुपनर साहब , पी आय ठाकूर साहब, शिंदे साहेब पेशकार, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापिका पठाण मूनवरी बेगम, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका जरीना नाहीद, सहशिक्षक परवेज देशमुख सर, मौजन कलीमउद्दीन सर, आयुब काकर सर सय्यद याकूब सर, इस्तियाक् सर, हाजी सैदोद्दीन सर, खान जकी सर,सय्यद बाखर सर, खान जावेद सर रहमान सर खूतेजा बाजी मसूद सर, मुशीर सर, फरहत बाजी , सय्यद सबात आली सर असरार सर आदींची उपस्थिती होती . महसूल प्रशासनातील व तसेच पोलीस प्रशासनातील कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ही रॅली यशस्वी होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले. या रॅलीस शाळेतील विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.