• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*मराठी पत्रकार परिषदेच्या बीड येथील मेळाव्यास पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे*

  • Home
  • *मराठी पत्रकार परिषदेच्या बीड येथील मेळाव्यास पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे*

*मराठी पत्रकार परिषदेच्या बीड येथील मेळाव्यास पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे*

*परळी तालुका शाखेच्या व डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने आवाहन*

परळी (प्रतिनिधी) :- मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हा आणि परळी तालुका शाखेच्या संयुक्त विद्यमाने 4 जून 2023 रोजी एम. आय.डी.सी.बीड येथील वैष्णवी मंगल कार्यालयात सकाळी 9.30 वा. मराठवाड्यातील पत्रकारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यास माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री पंकजा मुंडे, केज विधानसभा मतदारसंघाच्या नमिता मुंदडा, सामाजिक कार्यकर्ते तथा निर्भय बनो आंदोलनाचे नेते डॉ. विश्वंभर चौधरी, असिम सरोदे आणि परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, भारत राष्ट्र समितीचे परळी विधानसभा प्रमुख अॅड. माधव जाधव उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे राहणार आहेत. तरी या मेळाव्याला परळी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका मराठी पत्रकार परिषदेचे परळी तालुका समन्वय धनंजय आरबुने, तालुकाध्यक्ष बालकिशन सोनी शहराध्यक्ष जगदीश शिंदे, डिजिटल मीडिया परिषदेचे परळी तालुका अध्यक्ष नितीन ढाकणे, शहराध्यक्ष अभिमन्यू फड, सचिव दीपक गित्ते यांनी केले आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्या या मेळाव्यात माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठान च्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून पत्रकार भूषण पुरस्कार लोकप्रश्नचे संपादक दिलीप खिस्ती, कृषी भूषण पुरस्कार कल्याण कुलकर्णी यांना तर समाज भूषण पुरस्कार मनिषाताई तोकले यांना देण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकारांना पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून नग येथील पत्रकार सुर्यकांत नेटके यांना स्व. सुंदरराव सोळंके स्मृती पत्रकारिता सेवागौरव पुरस्कार तर पत्रकार अनिल जाधव यांना स्व. प्रभाकरराव कुलकर्णी स्मृती श्रमिक पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. यावेळी विश्वंभर चौधरी आणि असिम सरोदे यांचे “निर्भय बनो आंदोलनातील पत्रकारांची भूमिका” या विषयावर व्याख्यान होणार असुन परिषदेच्या जिल्हा शाखेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात असिम सरोदे पत्रकार आणि कायदा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ३ ते ४.३० या वेळेत समारोप होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून बीड विधानसभा मतदारसंघाचे आ.संदीप क्षीरसागर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख तसेच या प्रसंगी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,जिल्हा परिषद बीड चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शरद पाबळे, राज्य सरचिटणीस मन्सूरभाई शेख, राज्य कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य प्रसिद्धीप्रमुख अनिल महाजन राज्य समन्वयक डिजिटल मीडिया परिषद अनिल वाघमारे आदींची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमास परळी शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी मोठ्या उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे परळी तालुका समन्वय धनंजय आरबुने, तालुकाध्यक्ष बालकिशन सोनी, शहराध्यक्ष जगदीश शिंदे, डिजिटल मीडिया परिषदेचे परळी तालुका अध्यक्ष नितीन ढाकणे,शहराध्यक्ष अभिमन्यू फड,सचिव दीपक गित्ते यांनी केले आहे.