• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

परळी शहरातील गजानन लॉजवर सहायक पोलीस अधीक्षक डॉ. धीरज कुमार यांच्या पथकाचा छापा

ByDeepak Gitte

Jan 31, 2023

परळी शहरातील गजानन लॉजवर सहायक पोलीस अधीक्षक डॉ. धीरज कुमार यांच्या पथकाचा छापा

 

 

संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

 

परळी वैजनाथ :- डॉ. बी. धीरज कुमार सहाय्यक पोलीस अधिक्षक उपविभाग माजलगाव अतिरिक्त पदभार उपविभाग यांचे परळी शहरातील अवैध धंद्यांवर कारवाईचे सत्र सुरू असून अंबाजोगाई उप विभागातील नागरीकांच्या समस्या व तक्रारीची प्रथम प्राधान्याने दखल घेवुन परळी वैजनाथ शहरामध्ये चालणाऱ्या  अवैद्य धंदयाची गुप्त बातमीदारा मार्फत माहिती हस्तगत करुन परळी शहरात कार्यवाही केली आहे. दरम्यान शहर  पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसापासून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले आहेत.धीरज कुमार बच्चू यांच्या पथकाच्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून सुरू असलेल्या अवैद्य धंद्यावर कारवाईचे सत्र सुरूच ठेवावे असेही मागणी नागरिकांतून होत आहे.

 

पोलीस सूत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गजानन लॉज येथे चोरुन लपुन चालणारा वैश्या व्यवसायवर सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि एकशिंगे, पोउपनी गिते पोस्टे सिरसाळा, पोह  देशमुख, पोह  राठोड नेमणुक उपविपोअ कार्यालय माजलगाव, मपोअ सरपाळे पोस्टे दिंद्रुड, मपो आडे  सिरसाळा यांनी  छापा टाकला असता सदर  लॉजमध्ये ग्राहक नामे १) रामेश्वर संतराम शेप वय २५ वर्षे रा. शेपवाडी ता. अंबाजोगाई २) शैलेश समाधान शेप वय १९ वर्षे रा. शेपवाडी ता. अंबाजोगाई व पीडीत दोन महीला मिळुन आल्याने त्यांचेवर संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या  फिर्यादी वरून  कलम ३, ४, ५, ७ (२) (क) अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.