• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

दिनांक 23/05/2023 रोजी मा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की अंबाजोगाई शहरात गवळीपुरा येथे इसम नामे पाशा चौधरी व रहेमान सुलेमान हे आपले स्वतःचे फायद्या करिता बेकायदेशीर रित्या आपले रहाते घरासमोरिल पत्र्याच्या शेडच्या बंद रूम मध्ये काही इसमा एकत्र बसून जन्ना मन्ना ( अंदर बहार) नावा च्या जुगाराचे पत्त्यावर पैसे लावून हारजितचा जुगार खेळ खेळत व खेळवीत आहेत अशी खात्री लायक माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती मा. पोलिस अधीक्षक साहेब बीड मा. अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली स्वतः पंकज कुमावत साहेब पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे व त्यांचे पथकातील पोलिस आमलदार यांच्यासह सादर ठिकाणी रात्री 10.30 वाजता छापा मारला असता सदर ठिकाणी झन्नामन्ना नावाचा जुगार खेळणारे 24 लोक मिळून आले

त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून नगदी रुपये व झंनामंना नावाचे जुगाराचे साहित्य, मोटर सायकलि, मोबाईल विदेशि दारु असा एकूण 12 ,17 600 रुपयाचा माल जप्त करून एकूण 25 आरोपी विरुद पोहे राजू वंजारे यांच्य फिर्याद वरून पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथे गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक बीड नंदकुमार ठाकूर साहेब मा अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती कविता नेरकर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली स्वतः सहाय्यक पोलीस अधीक्षक मा पंकज कुमावत साहेब पोउपनि आनंद शिंदे पोलीस अंमलदार मुकुंद ढाकणे राजू वंजारे बालाजी दराडे दिलीप गीते गोविंद मुंडे चालक शिंगारे अंबाजोगाई शहर येथील पीएसआय चान्द मेंडके यांनी केली.