• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

ओबीसी आरक्षण जात असताना गप्प न बसता आवाज उठवला – प्रा.टी.पी.मुंडे

ओबीसी आरक्षण जात असताना गप्प न बसता आवाज उठवला – प्रा.टी.पी.मुंडे

केज व अंबाजोगाई तालुक्यातील वड माऊली, जवळगाव ,येथे संवाद बैठक!

परळी वैजनाथ प्रतिनिधी

मराठा समाज ओबिसीतून आरक्षण द्या मागणी करत आहे मात्र ओबीसी समाजाने विरोध केला. ओबीसींच्या मुला बाळाचा आरक्षणाचा तोडचा घास जात असताना आमचे नेते छगन भुजबळ साहेब, प्रकाश अण्णा शेंडगे आणि स्वतः मी गप्प न बसता आवाज उठवला आणि मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळू दिले नाही असे प्रतिपादन ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी केले.

बीड लोकसभेचे ओबीसी बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार यशवंत गायके यांच्या प्रचारार्थ केज तालुक्यातील वड माऊली, अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव, येथे संवाद बैठक आयोजित केली होती. गावकऱ्यांकडून त्यांचा श्रीफळ शाल देऊन सत्कार करण्यात आला.बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते.ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी मी एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून आवाज उठवला. सभेतून ज ककरांगेला जसाच तसे उत्तर दिले.

मराठा समाजाला 57 लाख कुणबी प्रमाणपत्र सरकारने वाटप केले परंतु त्या विरोधात आम्ही हायकोर्टामध्ये विरोध करत आहोत कोणत्याही परिस्थितीत ओबीसी चे आरक्षण आम्ही जाऊ देणार नाही. ओबीसीच्या मुलाबाळांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढत आहोत.ओबीसीच्या आरक्षणाचा बचाव करण्यासाठी ओबीसी बहुजन पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून मतदानरुपी आशीर्वाद द्या अशी विनंती त्यांनी केली.दरम्यान त्यांनी वड माऊली देवीचे दर्शन घेतले.

ओबीसी बहुजन पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष भीमराव मुंडे,सरपंच बाळासाहेब मुंडे,नितीन हारे,अरविंद मुंडे,अशोक ठोंबरे, रामधन ठोंबरे,वैभव ठोंबरे,महादेव ठोंबरे,बाळासाहेब ठोंबरे आदी सह गावातील नागरिक उपस्थित होते.