• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत आज परळीत भाजपच्या विविध आघाड्यांचा मेळावा

  • Home
  • खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत आज परळीत भाजपच्या विविध आघाड्यांचा मेळावा

 खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत आज परळीत भाजपच्या विविध आघाड्यांचा मेळावा
 सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
 एन एच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे विविध आघाड्यांचा मेळावा

परळी वैजनाथ ।

मोदी @9 महा जनसंपर्क अभियानांतर्गत आज २५ जून रोजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या विविध आघाड्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, या मेळाव्यास सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण देशभर भाजपच्या वतीनं महा जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात आहे, त्याचाच एक भाग म्हणून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहेत. आज रविवारी २५ तारखेला सकाळी ११ वा. एन एच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे परळी मतदारसंघातील भाजपच्या विविध आघाडया ज्यात युवा मोर्चा, महिला मोर्चा, अनुसूचित मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा,भटक्या विमुक्त आघाडी, विद्यार्थी आघाडी, दिव्यांग सेल, डॉक्टर सेल,अशा विविध प्रकोष्ट ,आघाडयांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास खा. डॉ.प्रितमताई मुंडे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, या मेळाव्यास भाजप तसेच आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महा जनसंपर्क अभियान समितीने केले आहे.