• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

◼️मराठी पत्रकार परिषदेच्या मराठवाडास्तरीय अधिवेशनास मोठया उत्साहात सुरुवात

  • Home
  • ◼️मराठी पत्रकार परिषदेच्या मराठवाडास्तरीय अधिवेशनास मोठया उत्साहात सुरुवात

◼️मराठी पत्रकार परिषदेच्या मराठवाडास्तरीय अधिवेशनास मोठया उत्साहात सुरुवात

मराठी पत्रकार परिषदेच्या मराठी आपल्या पत्रकारांची पहिली आणि सर्वसमावेशक एकमेव संघटना

बीड:
अंतर्गत बीड येथे , सुरू असलेल्या मराठवाडा स्तरीय अधिवेशनास मोठया उत्साहात सुरुवात ,झालेली असून
मराठी पत्रकार परिषदेच्या या मेळाव्यात माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठान च्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण पत्रकार भूषण पुरस्कार लोकप्रश्नचे संपादक दिलीप खिस्ती, कृषी भूषण पुरस्कार कल्याण कुलकर्णी यांना तर समाज भूषण पुरस्कार मनिषाताई तोकले यांना देण्यात आला.
याच कार्यक्रमात मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकारांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले असून नगर येथील पत्रकार सुर्यकांत नेटके यांना स्व. सुंदरराव सोळंके स्मृती पत्रकारिता सेवागौरव पुरस्कार तर पत्रकार अनिल जाधव यांना स्व. प्रभाकरराव कुलकर्णी स्मृती श्रमिक पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले,
यावेळी विश्वंभर चौधरी आणि असिम सरोदे यांचे “निर्भय बनो आंदोलनातील पत्रकारांची भूमिका” या विषयावर व्याख्यान होणार असुन परिषदेच्या जिल्हा शाखेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
दुपारच्या सत्रात असिम सरोदे पत्रकार आणि कायदा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ३ ते ४.३० या वेळेत समारोप होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून बीड विधानसभा मतदारसंघाचे आ.संदीप क्षीरसागर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख तसेच या प्रसंगी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,जिल्हा परिषद बीड चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शरद पाबळे, राज्य सरचिटणीस मन्सूरभाई शेख, राज्य कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य प्रसिद्धीप्रमुख अनिल महाजन राज्य समन्वयक डिजिटल मीडिया परिषद अनिल वाघमारे आदींची उपस्थिती लाभणार आहे.