• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

ND NEWS
सिरसाळा/प्रतिनिधी
परळी तालुक्यातील सिरसाळा येथे कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता कोव्हीड केअर सेंटर तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन सरपंच प्रतिनिधी राम किरवले यांनी दिनांक 25 रोजी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की सिरसाळा गावासह परिसरातील काही गावात कोरोना महामारीचा गंभीर प्रदुभाव वाढलेला असुन जवळपास सिरसाळा गावासह परिसरातील काही गावे कोरोना विशाणूने बाधीत झालेले असुन परिस्थिती अतिशय गंभीर होत आहे दररोज नवीन रुग्ण संख्या वाढत आहे यासाठी सिरसाळा गावात सर्व सुविधा सुसज्ज युक्त असे कोव्हिड केअर सेंटर मंजूर करून तात्काळ कार्यान्वित झाले तर या भागातील रुग्णांना वेळेवर उपचार व सर्व सुविधा मिळू शकते परळी अंबाजोगाई या गावी जाण्याची गरज भासत नाही तरी पालकमत्र्यांनी आपल्या स्तरावरून सिरसाळा येथे सर्व सुविधा युक्त सुसज्ज असे सवतंत्र कोव्हिड केअर सेंटर त्वरीत सुरू करण्यात यावे अशी मागणी सरपंच प्रतिनिधी राम किरवले यांनी निवेनाद्वारे केली आहे