• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

गेवराई पोलिस ठाणे व शनिप्रसाद गोशाळा येथे आधार माणुसकी ग्रुपच्या एक झाड एक सेल्फी मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

ByND NEWS INIDIA

Apr 28, 2021

 

गेवराई प्रतिनिधी: सुशील टकले 

बीड जिल्ह्यात कोरोनाचा  हाहाकार माजला असुन अनेक रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडत आहे. ही ऑक्सिजनची कमतरता जिल्हा भर नसून भारत भर ऑक्सीजनचा तुटवडा भासत आहे.

एक झाड शंभर माणसाला पुरेल एवढा ऑक्सिजन देते परंतु अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून त्याचा परिणाम आज जाणवू लागला आहे थेट विदेशातून ऑक्सिजन आणण्याची गरज आज भारत देशावर आली आहे हेच जाणून आधार माणुसकी ग्रुप च्या वतीने वेळोवेळी वृक्षारोपण व समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतात सध्या कोरोणा रोगाच्या महामरिने व ऑक्सीजन च्या कमतरतेने हाहाकार माजला असताना. निसर्ग व ऑक्सीजन वाढीसाठी आधार माणुसकीचा ग्रुप च्या एक झाड एक सेल्फी या मोहिमेअंतर्गत पोलीस अंमलदार रणजित पवार यांच्या आवाहनास प्रतिसाद देत बुधवारी दोन ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले पहिले वक्षारोपण पोलीस स्टेशन गेवराई येथे पोलीस निरीक्षक श्री. संदिप काळे यांच्या हस्ते तर दुसरे वृक्षरोपण शनिप्रसाद गोशाळा राक्षसभुवन येथे ह.भ.प. तीर्थराज महाराज पठाडे यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी पोलीस अंमलदार किरण पोतदार, गणेश नांगरे, सचिन मस्के, सुमित करंजकर पत्रकार सुभाष सुतार, किरण बेदरे व इतर जन उपस्थित होते