• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

रेमेडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार थांबवण्यासाठी पंकजा मुंडे यांचे अजित पवारांना पत्र

ByND NEWS INIDIA

Apr 28, 2021

ND NEWS बीड: रेमडिसीविर इंजेक्शनचा बीडमध्ये सर्रास काळाबाजार होत असून या इंजेक्शनचा वापर विशिष्ट पक्षाचे नेते व कार्यकर्ते स्वतःच्या कार्यालयातून करत असल्याचा गंभीर आरोप पंकजा मुंडे यांनी अजित पवार यांना दिलेल्या पत्रात केला आहे. विशेष म्हणजे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नावावर हे इंजेक्शन प्रशासनाकडून ताब्यात घेतले जात आहे. या वेळी चुकीच्या पद्धतीने डॉक्टरांच्या सह्या इंजेक्शनच्या मागणीसाठी घेतल्या जात आहेत असे सुद्धा पंकजा मुंडे याने पत्रामध्ये म्हटले आहे.