• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

विनापरवाना माती उपसा करणाऱ्यांना मंडळ अधिकारी सुर्यवाड व तलाठी फड यांचा दणका

श्रीहरी कांबळे : बीड

ND NEWS :lबीड  (प्रतिनिधी) गेली अनेक दिवसांपासून जिल्हाभरात सर्वत्र कधी रेती तर कधी माती माफियांचे पराक्रम ऐकायला मिळत आहेत. यातच हे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मर्जीने चालू आहे की काय असेही लोकांना वाटत होते यातच परळी तालुक्यातील सिरसाळा येथून जवळच असलेल्या पोहणेर गोदावरी पात्रातील वाळू उपशा नंतर आता काही माफियांनी सिरसाळा व परिसरात विना परवाना माती उपश्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.

मागील आठ दिवसांपासून सिरसाळा परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेतातील माती विना परवाना दिवसा ढवळ्या उपसली जात असून जिसिबी आणि टिप्पर च्या साह्याने विना परवाना माती उपसून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात होता . व ही माती वाहतूक करून विट भट्टी करिता देऊ करत होते . यावर आज सिरसाळा येथील मंडळ अधिकारी व्यंकट सुर्यवाड व तलाठी  गणेश फड यांनी गोवर्धन (ही.) येथे विना परवाना माती उपसा कारणारांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यांनी एक जेसिबी आणि टिप्पर जप्त करत ते सिरसाळा पोलिस स्टेशन येथे लावण्यात आले आहे . यावेळी सदर कारवाई तहसीलदार शेजुळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी व्यंकट सुर्यवाड यांच्या सह तलाठी गणेश फड यांनी केली आहे.