• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केज शहरातील समर्थनगर मध्ये येणाऱ्या कोंबड्याच्या पिसांचा तात्काळ बंदोबस्त करा- समाजसेवक हनुमंत भोसले

ByDeepak Gitte

Apr 26, 2021

केज शहरातील समर्थनगर मध्ये येणाऱ्या कोंबड्याच्या पिसांचा तात्काळ बंदोबस्त करा- समाजसेवक हनुमंत भोसले

प्रतिनिधी- हनुमंत गव्हाणे

ND NEWS | दि.२६- केज शहरातील समर्थनगरच्या सर्वच गल्ल्यां मध्ये शासकीय फलोत्पादन खात्याच्या मोकळ्या जागेतून मोठ्या प्रमाणात कोंबड्याची पिसे व इतर कचरा उडून येत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून केज नगरपंचायतने याकडे तात्काळ लक्ष द्यावे नसता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा केज विकास संघर्ष समितीने दिला आहे.
केज शहरात शासकीय मालकीची फलोत्पादन खात्याची मोकळी जागा मुख्य महामार्गाला लागून आहे. ही जागा सध्या पडीक आहे.
याच जागेला लागुन महामार्गालगत  कांही चिकन विक्री दुकानें आहेत. या दुकानात विकल्या जानाऱ्या कोंबड्यांची पिसे फलोत्पादन खात्याच्या उघड्या जागेत पसरलेली असल्याने वाऱ्याबरोबर ही पिसे उत्तरे कड़ील बाजूस वस्ती असणाऱ्या समर्थ नगर भागातील गल्ल्यामध्ये अस्ताव्यस्त पणे रस्त्यावर व घरात पसरत आहेत. याचा  नागरिकांना मोठा त्रास होत आहे. या बाबीची केज नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या भागात पसरणारी कोंबड्यांची पिसे व इतर घाण रोखावी. नसता नागरिकांच्या सहभागाने या विरोधात सोमवार दि 3 मे 2021 रोजी केज नगरपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा देत आहे. तरी केज नगरपंचायत प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन ती दूर करावी असे आवाहन समितीनेच्या वतीने हनुमंत भोसले यांनी केले आहे.