• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

मानवलोक संस्थेच्या बनसारोळा येथील कोव्हिड केअर सेंटरचे खा.सुप्रिया सुळे ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाईन उद्घाटन .

ByND NEWS INIDIA

Apr 26, 2021

सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असणाऱ्या अंबाजोगाई येथील मानवलोक संस्थेने केज तालुक्यातील बनसारोळा येथे 50 बेडची उभारणी केली आहे या सेंटरचे ऑनलाइन उद्घाटन खा. सुप्रियाताई सुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज दिनांक 26 एप्रिल सोमवार रोजी दुपारी ४ वाजता करण्यात येणार आहे.

बनेश्वर शिक्षण संस्थेचे महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा येथे 50 बेडची सर्व सुविधायुक्त कोव्हीड केअर सेंटरची उभारणी अनिकेत लोहिया, भागवतराव गोरे ,गोविंदराव देशमुख, डॉक्टर नरेंद्र काळे आदींनी परिश्रम घेतले आहेत

या कार्यक्रमास आमदार संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे ,जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या ताई शिरसाट ,जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गीते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राधाकिसन पवार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संस्थेच्या वतीने अनिकेत लोहिया यांनी दिली आहे