• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केज शहरातील कोव्हीड सेंटर मधील  कोरणा बाधित रुग्णांना जेवण देण्यास दिरंगाई

ByND NEWS INIDIA

Apr 25, 2021

हनुमंत गव्हाणे: (केज तालुका प्रतिनिधी)

ND NEWS: केज तालुक्यात कोरणा बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पिसेगाव येथील कोव्हीड सेंटरमध्ये मध्ये बेड कमी पडत असल्याने शारदा इंग्लिश स्कूल मध्ये दुसरे कोव्हीड सेंटर उभारण्यात आले मात्र सकाळचे जेवण दुपारी तीन वाजेपर्यंत ही मिळत नसल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक व केज तालुका प्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा करत यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून दिरंगाई कोण करतंय हे समोर आणले आहे. रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नसल्याच्या तक्रारी वरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केज तालुकाप्रमुख रत्नाकर अप्पा शिंदे यांच्यासह मागील आठ दिवसापूर्वी दोन्ही कोव्हीड केअर सेंटरला भेट देऊन वेळेवर जेवण जेवण देण्याचा इशारा दिला होता त्यावेळी ठेकेदार यांनी सुद्धा सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आज दिनांक 25 एप्रिल रविवार रोजी जेव्हा परिस्थिती पाहिली तेव्हा ही जेवण वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या त्यामुळे रत्नाकर आप्पा शिंदे यांनी ठेकेदार व रुग्णालयाचे वितरक यांना समोरासमोर उभे करून कारण विचारले असता आम्ही वेळेवर जेवण बनवतो मात्र वितरण करणारे दिरंगाई करत असतात असे सांगितले तर वितरण करणारे आमच्याकडून दिरंगाई होत नसल्याचे स्पष्ट केले त्यामुळे रत्नाकर आप्पा शिंदे यांनी चूक कोणाची असो यापुढे वेळेवर जेवण मिळाले पाहिजे अन्यथा शिवसेना स्टाईलने व्यवस्था करू असा इशारा देण्यात आला.