• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

कन्येच्या वैद्यकीय उपचारासाठी परळीकर काढणार सोमवारी भव्य मदत फेरी*

ByDeepak Gitte

Feb 26, 2023

*कन्येच्या वैद्यकीय उपचारासाठी परळीकर काढणार सोमवारी भव्य मदत फेरी*

*_कु.सान्वी शिवदीप चौंडेसाठी परळीकर एकवटणार; मोठ्या संख्येने सहभागी व्हा_*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
परळीची भूमीकन्या कु.सान्वी शिवदीप चौंडे हिस अतिशय दुर्मिळ असा आजार झाला आहे. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत असून, त्यावरील शस्त्रक्रियेसाठी जवळपास २५ ते ३० लक्ष रुपयांचा खर्च येतो आहे. कु.सान्वीचे कुटुंब अत्यंत सामान्य असून वडील प्रेस कामगार आहेत. जेमतेम अर्थव्यवस्था असलेल्या या कुटुंबाला हा खर्च पेलणारा नाही. परळीची कन्या म्हणून तिच्या उपचारासाठी निधी गोळा करण्यासाठी शहरातून भव्य अशी मदत फेरी काढण्यात येणार आहे. सोमवार दि.२७ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ही फेरी निघेल.

थालोसेनिया हा अत्यंत दुर्मिळ असा गंभीर आजार असल्याचे डॉक्टर सांगतात. लाखांत एकालाच होणारा हा आजार आहे. यावरील उपचार सुद्धा फार गुंतागुंतीचे आहेत. शस्त्रक्रियेचा खर्चही अफाट आणि सर्वसामान्य कुटुंबाला न पेलवणारा असा आहे. कु.सान्वी शिवदीप चौंडे या सात वर्षीय चिमुकलीला हा आजार जडला आहे. मागील अनेक वर्षांपासून या आजाराशी हे कुटुंब संघर्ष करत आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून २५ ते ३० लक्ष रुपये खर्च येतोय. हा निधी परळी शहरातून उभा करण्याचा संकल्प करण्यात आला असून, यासंदर्भात नियोजन बैठक जिजामाता उद्यान येथे रविवारी सकाळी संपन्न झाली. सोमवार, दि.२७ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ही मदत फेरी निघेल. तेथून अण्णाभाऊ साठे चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, एकमिनार चौक, मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर, गणेशपर, अंबेवेस, प्रभू वैद्यनाथ मंदिर, बाजीप्रभू चौक (तळ) येथून जिजामाता उद्यान येथे या मदत फेरीचा समारोप होणार असल्याचे मदत संकलन समितीकडून सांगण्यात आले आहे.

*परळीच्या लेकीला सढळ हाताने मदत करा*
कु.सान्वी शिवदीप चौंडे या परळी कन्येच्या वैद्यकीय उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो आहे. कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हालाखीची आहे. या चिमुकलीला आपल्या मदतीने उपचार मिळू शकतील आणि तिला जीवदान मिळेल. अत्यंत गोड अशा या लेकराला आपल्याकडून मदतीची अपेक्षा आहे. आपली कन्या, आपली लेक म्हणून परळीतील प्रत्येकाने पुढे येऊन सढळ हाताने मदत करावी.

मदतीसाठी खालील खाते क्रमांकावर  मदत करावी.

खाते क्र:-62081783982

IFSC CODE:-SBIN0020030

ऑनलाइन फोन पे, गुगल पे वर मदतीसाठी खालील क्रमांक वापरावा

फोन पे, गुगल पे :- 7276734848

शिवदीप उमाकांत चौंडे