• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

ऑनलाईन मस्टर”प्रकरणी ग्रामपंचायत नंदागौळने केलेल्या तक्रारीची रोहयोचे अप्पर मुख्यसचिव मा.नंदकुमार साहेबांनी घेतली दखल!

◼️”ऑनलाईन मस्टर”प्रकरणी ग्रामपंचायत नंदागौळने केलेल्या तक्रारीची रोहयोचे अप्पर मुख्यसचिव मा.नंदकुमार साहेबांनी घेतली दखल!

◼️सात दिवसात शासनास अहवाल सादर करण्याचे संबंधीताना दिले आदेश!

◼️परळी तालुक्यात 1 ऑक्टोबर ते 22 फेब्रुवारी पर्यंत एकही मस्टर निर्गमित केले नाही हे दुर्दैवी !

◼️जनता पंचायत समितीला खेटे मारून हैराण ; म्हणून द्यावी लागली मंत्रालयात तक्रार – सुंदरभाऊ गित्ते

बीड | प्रतिनिधी

परळी तालुक्यातील नंदागौळ ग्रामपंचायतच्या माध्यमातून रोहयो योजने अंतर्गत जलसिंचन विहिरी,गायगोठ्यासह अन्य कामे करण्यात येत असून मागील 1 ऑक्टोबर 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत अनेक वेळा मस्टर काढण्यासाठी मागण्या देऊनही पंचायत समिती,परळी वैजनाथ कडून एकही ऑनलाईन मस्टर निर्गमित न केल्याने ग्रामपंचायत नंदागौळचे सरपंच सुंदरभाऊ गित्ते यांच्या वतीने सिद्धेश्वर मुंडे यांनी मंत्रालयात जाऊन 22 फेब्रुवारी रोजी रोहयोचे अप्पर मुख्यसचिव मा.नंदकुमार साहेबाना याबाबतचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली असता,त्यांनी त्याच क्षणी या महत्वपुर्ण प्रकरणाची दखल घेऊन तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले,त्यानुसार त्याच दिवशी म्हणजे 22 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासनाचे सहाय्यक संचालक विजयकुमार कलवले यांनी मा.उपजिल्हाधिकारी रोहयो विभाग यांना पत्र देऊन या प्रकरणात 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त की,रोहयो विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला विविध वैयक्तिक योजना देऊन प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचे राज्य शासनाचे ध्येय आहे,परंतु जर पंचायत समिती स्तरासारख्या स्थानिक पातळीवर जर योजनेची अंमलबजावणी होत नसेल,सुरू असलेल्या कामाचे ऑनलाईन मस्टर निर्गमित केले जात नसेल तर 8 दिवसात मजुरांना मजुरी मिळणार नाही आणि जो शेतकरी योजना घेत आहे,त्याला सुद्धा मोठी अडचण निर्माण होऊ शकते,परळी तालुक्यातील नंदागौळ मध्ये युवकनेते सुंदरभाऊ गित्ते यांनी ग्रामपंचायत कडून रोहयोच्या माध्यमातून अनेक योजना देऊन गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांच्या जीवनात मोठी क्रांती घडवून आणण्याचे नियोजन केलेले आहे,तरीही मागील 1 ते 2 वर्षापासून एकट्या नंदागौळ गावातील शेतकऱ्यांचे सुमारे 7 ते 8 लाख रुपये पेमेंट Reject मध्ये आहे,ते काढण्यास वारंवार टाळाटाळ होत आहे,परळी तालुक्यात मागील 1 ऑक्टोबर 2022 ते 22फेब्रुवारी 2023 पर्यंत कोणत्याही प्रकारचे एकही मस्टर निर्गमित केलेले नाही,ग्रामरोजगार सेवक मागणी घेऊन गेल्यावर त्यावर पोहच सुद्धा देण्यात येत नाही,तरीही जानेवारी 22 व फेब्रुवारी 23 मध्ये दाखल केलेल्या मागणीवर सरपंच सुंदरभाऊ गित्ते बोलल्यावर पोहच दिली,तरीही ऑनलाईन मस्टर निर्गमित केले नाहीत,त्यामुळे सुंदरभाऊ गित्ते यांच्या वतीने सिद्धेश्वर मुंडे यांनी 22 फेब्रुवारी रोजी रोहयोचे अप्पर मुख्यसचिव मा.नंदकुमार साहेब यांची भेट घेऊन निवेदन देत सविस्तर चर्चा केली असता,त्यांनी हे प्रकरण पाहताच त्यावर तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्याच दिवशी दिले,त्यानुसार महाराष्ट्र शासनाचे सहाय्यक संचालक मा. विजयकुमारजी कलवले यांनी बीडच्या रोहयो विभागाचे मा.उपजिल्हाधिकारी यांना या प्रकरणात 7 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत,यावेळी बोलताना सुंदरभाऊ म्हणाले की तालुक्यातील नागरिक पंचायत समितीला मागणी,मस्टर व इतर कामासाठी खेटे मारून हैराण झाले तरी पंचायत समितीला जाग येत असल्याने मंत्रालयात तक्रार द्यावी लागली.