• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

डॉ.दि.ज.दंडे यांचे जीवन सर्वांसाठीच प्रेरणादायी-पंकजाताई मुंडे

*दंडे कुटूंबियांच्या वतीने कृष्णार्पणमस्तू ग्रंथ पुस्तिका दिली भेट*

*परळी वैजनाथ/प्रतिनिधी*

डॉ.दि.ज.दंडे आणि मुंडे कुटूंबिय यांच्यातील नाते हे अत्यंत स्नेहपूर्ण व तेवढेच जिव्हाळयाचे होते. अगदी लहानपणापासून मी त्यांना पाहत आले असून आपले जीवन इतरांसाठी कसे जगावे याचे ते शाश्वत उदाहरणच होते. समाजकारण व बँकींग क्षेत्रात त्यांनी केलेले काम सर्वांसाठीच आदर्श असे उदाहरण असून अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही असे मत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केले.
डॉ.दि.ज.दंडे यांच्यावरील कृष्णार्पणमस्तू या ग्रंथ पुस्तीकेची प्रत आज दंडे परिवाराच्या वतीने पंकजाताई मुंडे यांना भेट देण्यात आली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. मी लहान असतानापासून डॉ.दि.ज.दंडे यांना पाहत आले असून त्यांचे एकुणच जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी होते. आमच्या नियोजित कार्यक्रमामुळे प्रकाशन समारंभासाठी आम्ही उपस्थित राहू शकलोे नाही असे सांगत मी जिथे असेल तिथे डॉ.दंडे यांच्या आठवणीशिवाय राहू शकत नाही असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी दंडे परिवाराच्या वतीने पंकजाताई मुंडे यांचे स्वागत करण्यात आले. कृष्णार्पणमस्तू पुस्तिकेचे त्यांनी अवलोकन केले. पुस्तिकेत असलेल्या लेख आणि छायाचित्र गॅलरीचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी डॉ.विवेक दंडे व सौ.प्राजक्ता विवेक दंडे यांनी पंकजाताई मुंडे यांचे शाल, श्रीफळ व पुप्पहार देवून स्वागत केले.