• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

एक असामान्य व्यक्तिमत्त्व कान्होबा शंकर तूपसागर यांचा जीवन परिचय

एक असामान्य व्यक्तिमत्त्व कान्होबा शंकर तूपसागर यांचा जीवन परिचय

अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले कार्यकारी रसायनशास्त्र के एस तूपसागर हे महानिर्मिती कंपनीमध्ये प्रदीर्घ सेवापूर्ती करून दि ३१ जानेवारी २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या जीवनपरिचयाचा लेख देत आहोत.

 

निवृत्ती हा असा प्रसंग आहे जिथे माणसाला बोलण्यासाठी शब्द कमी पडतात कारण त्यावेळी मनात संमिश्र भावना निर्माण होतात. त्या वेळी त्या व्यक्तीच्या डोळ्यांसमोर आनंदाचे क्षण आणि दुःखाचे दोन्ही क्षण आच्छादलेले असतात.

अतिशय खडतर परिस्थितीमध्ये ज्यांनी शिक्षण घेऊन आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून त्याच बुद्धिमत्तेच्या जोरावर एक नाही दोन नाही तर तब्बल 9 राष्ट्रीय पुरस्कार पारस व परळी वैजनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्रांना मिळवून दिले या मागचे नाव म्हणजेच कान्होबा शंकर तूपसागर कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ होय
———————————————————————-
त्यांच्या कार्याचा कार्यपरिचय पुढीलप्रमाणे

संपूर्ण नाव – कान्होबा शंकर तूपसागर
जन्मतारीख १ फेब्रुवारी १९६५
जन्मगाव :अंजनडोह ,ता: किल्लेधारूर जी: बीड

कुटुंबाची माहिती
त्यांना भाऊ ३ आणि ६ बहिणी
आईचे नाव जनाबाई शंकर तूपसागर

कान्होबा शंकर तूपसागर यांचा शैक्षणिक परिचय

शिक्षण –
प्राथमिक शिक्षण – जन्मगावी (अंजनडोह येथे) १९७५
माध्यमिक शिक्षण – नुतन माध्यमिक विद्यालय अंजनडोह मार्च १९८१
उच्च माध्यमिक शिक्षण – बलभीम महाविद्यालय बीड
पदवी शिक्षण BSc बलभीम महाविद्यालय बीड
पदवीत्तर पदवी -MSc डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद मे १९८९
LLB शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर सप्टेंबर २००५
LLM शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर सप्टेंबर २०१०
MBA YCMOU नाशिक मे २०१२

या शैक्षणिक कसरतीनंतर प्रथम

नौकरीची जाहिरात दि २३ ऑगस्ट १९८९
पहिली मुलाखत – केमिस्ट – २१-ऑक्ट १९८९
नौकरीसाठी निवड – २१ फेब्रुवारी १९९०
ट्रेनिंग कालावधी – कोराडी ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी
१ मार्च १९९० ते ३१-ऑगस्ट १९९०
ट्रेनिंग नंतर मुलाखत १८ सप्टेंबर १९९०

प्रथम नोकरीस सुरुवात चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन येथे झाली.

(३२ वर्षे सेवा दिली)

कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ – १९९० ते २००४
वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ २००४ ते २०१३
कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ – २०१३ ते २०२३
पारस पॉवर स्टेशनला यांच्या कालावधीमध्येच ६ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत व परळी थर्मल पॉवर स्टेशनला यांच्याच कालावधीमध्ये ३ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत हे साहेबांच्या कार्याचे फलीतच.
———————————————————————-
कान्होबा शंकर तूपसागर यांचे BSc बलभीम महाविद्यालय बीड येथे पूर्ण झाले कसल्याही प्रकारचे ट्युशन (शिकवणी) नव्हते. त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. शिक्षणासाठी आई वडिलाने प्रोत्साहन दिले. त्यानंतर MSc डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे मे १९८९ रोजी झाली. शिक्षण झाल्या झाल्याचं नौकरीची जाहिरात निघाली व त्यामध्ये ते यशस्वी ठरले . नौकरीस रुजू झाल्यानंतर सुरुवातीची ट्रैनिंग कोराडी येथे झाली आहे. नोकरीची सुरुवात २४ सप्टेंबर १९९० रोजी झाली. त्यावेळेस तेथे श्री साईनाथ साहेब मुख्यभियंता म्हणून कार्यरत होते. ते स्वभावाने खूप चांगले होते. पण कामकाजामध्ये कडक परंतु मनाने दयाळू होते. त्यांच्याकडूनच प्रसंगी कठोर व प्रोत्साहन कसे द्यायचे हि गोष्ट त्यांच्याकडून शिकले. चंद्रपूरला असताना WTP-१/२ ला जॉईन झाले. तेथे कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ बॅनर्जी साहेब होते. कामात तज्ञ, टेकनिकली साऊंड होते. एक काम हातात घेतले की ते काम पूर्ण झाल्याशिवाय ते स्वस्त बसत नसत. त्यामुळे हिच सवय त्यांच्यामुळेच त्यांना लागली. कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जायचे. सुरुवातीला प्लॅन्टमध्ये खूप अडचणी आल्या. त्यावेळी बॅनर्जी साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन खूप कामी आले. त्यांचे ड्राफ्टींग खूप चांगले होते. रिपोर्टींग, मॉनिटरिंग करण्याची कार्यपद्धत त्यांची खूप चांगली होती. त्यांच्या चांगल्या गोष्टींचा त्यांना नौकरीच्या सेवाकाळामध्ये खूप फायदा झाला. नंतर श्री खटावकर साहेब हे कार्य कुशल प्रशासक म्हणून खूप चांगले मिळाले. त्यांच्याकडून प्रशासकीय अनुभव मिळाले शिकले. ज्या वेळी चंद्रपूरला रुजू होण्यासाठी गेले होते. तेव्हा श्री मुलचंदानी साहेबाची खूप मदत झाली. न विचारताही एखाद्याला कशी मदत करायची हा गुण त्यांनी त्यांच्याकडून शिकला. तूपसागर साहेब व त्यांचे वर्गमित्र लोहे दिनकर, राजू धावडे, मुकुंद कुलकर्णी असे चौघेजण एकदाच चंद्रपूरला जॉईन झाले. सर्वानी चंद्रपूरला नौकरी केली. एच डी वासनिक यांचेही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

नौकरी लागल्यानंतर २ वर्षाने १९ मे १९९२ मध्ये त्यांचे लग्न झाले त्यांच्या गावातील कांबळे यांनी हे लग्नाचे स्थळ आणले होते. त्यांचे सासरे आ विनायकराव भोसले हे कळब मतदारसंघातील आमदार होते. तूपसागर साहेब यांचे शिक्षण खूप खडतर व हलाखीच्या परिस्थितीत झाले. त्यांनी शिक्षण घेत असताना मुलांची ट्युशन (शिकवणी) घेऊन स्वतःचा सर्व खर्च भागवीत होतो. शिक्षण घेत असताना शेतात देखील काम केले. त्यावेळी कॉलेज मध्ये शिष्यवृत्ती मिळत असे. त्यातच सर्वकाही खर्च भागवावा लागत असे. काही गोष्टींची इच्छा असूनसुद्धा त्या विकत घेत नसत.

परंतु त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड असल्यामुळे खूप पुस्तके वाचली. नंतर नौकरी करत असताना पगाराचा काही भाग पुस्तकासाठी खर्च करत असे, त्यामुळेच त्यांची सध्याच्या त्यांच्या ग्रंथालयांची किंमत ३ लाखांच्या आसपास आहे.

तूपसागर साहेबांचे सासरे हे आमदार होते. परंतु त्यांचा फायदा त्यांनी कधीच करून घेतला नाही. साहेबाना पत्नी चांगली मिळाली तिच्यामुळेच ते महाजनको ची नोकरी चांगल्या प्रकारे करू शकले. साहेबानी त्यांच्या पत्नीला लग्न झाल्यांनतर LLB व BEd व कॉम्पुटरचे शिक्षण दिले. सध्या त्या बीड जिल्ह्याच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा आहेत. त्यांना राजकारणाची आवड आहे. त्या जीवनात एक ना एक दिवस चांगल्या पदावर निवडून जातील. त्यांना चांगले पद मिळेल. अशाही आपल्या बद्दल माहिती देताना त्यांनी आपल्या पत्नीबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या.

परळी औष्णिक विद्युत केंद्राला विशेष कामगिरीबद्दल यावर्षी मे २०२२ मध्ये जलव्यवस्थापन आणि ऑगस्ट २०२२ ला पर्यावरण व्यवस्थापनातील उत्कृष्टतेबद्दल दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व लक्षात घेऊन वीज उत्पादन प्रक्रियेत संवर्धन विषयक जाणीवेने काटकसरीने पाणी वापर, पाण्याचा पुनर्वापर,शून्य पाणी निचरा इत्यादीची प्रत्यक्ष अंमलबजावली केल्याने जिल्हायातील महानिर्मितीच्या महत्वाकांक्षी ७५० मेगावॉट स्थापित क्षमतेच्या येथील विद्युत निर्मिती केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. नुकतेच पर्यावरण उत्कृष्टता परिषद या मानांकित संस्थेच्या वतीने ऑनलाईन पार पडलेल्या राष्ट्रीय परिषद आणि जल व्यवस्थापन पुरस्कार-२०२२ थर्मल पॉवर प्लांटमधील जल कार्यक्षमता”
————————————————–
औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची मोठी उपलब्धी…
“जल व्यवस्थापनातील उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार” थर्मल पॉवर प्लांट्समधील जल कार्यक्षमता, संपूर्णपणे परस्परसंवादी नेक्स्टजेन एअरमीट व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मद्वारे आयोजित केले आहेत. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात पाण्याच्या एका एका थेंबाचे महत्त्व जाणून वीज निर्मिती करत आहे, विजेच्या निर्मितीमध्ये पाण्याचा वापर इष्टतम करणे, सांडपाण्याचा पुनर्वापर करणे, शून्य द्रव निर्वहन धोरणाची अंमलबजावणी करणे.यासाठी थर्मल ला “एनव्हायरो एक्सलन्स कौन्सिल द्वारे सन्मानित केले जाते. कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ कान्होबा शंकर तुपसागर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांच्या परिषदेला उपस्थित राहून व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मद्वारे हे पुरस्कार स्वीकारले. येथील थर्मलला दोन श्रेणींमध्ये दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय जल कार्यक्षमता पुरस्कार -२०२२ मिळाले आहेत. २५० मेगावॅटपेक्षा कमी क्षमतेच्या आयपीपी मध्ये जल व्यवस्थापनातील उत्कृष्टतेसाठी पश्चिम विभागातील पहिला विजेता तर जल व्यवस्थापनातील उत्कृष्टतेसाठी नवीन उपक्रम आणि आयपीपी मधील शून्य द्रव निर्वहन संयंत्रासाठी दुसरा विजेता. हा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. कारण पाण्याच्या विशिष्ट वापराची मूल्ये सिईए कडून घेण्यात आली होती. या पुरस्कारामध्ये अनेक सरकारी आणि खाजगी थर्मल सहभागी झाले होते. येथील थर्मल ने एम ओईएफ आणि सिसी द्वारे दिलेल्या विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी म्हणजे ३.५ lit/kwh पर्यंत विशिष्ट पाण्याचा वापर राखला आहे. २०२१-२२ मध्ये विशिष्ट पाण्याचा वापर ३.१९ टक्के होता. येथील विद्युत निर्मिती संघ आणि जल प्रक्रिया प्रकल्प टीम.

असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले कार्यकारी रसायनशास्त्र के एस तूपसागर हे महानिर्मिती कंपनीमध्ये प्रदीर्घ सेवापूर्ती करून दि ३१ जानेवारी २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. —भगवान साकसमुद्रे परळी ९४२१३४६१४४