• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

बाळासाहेबांची शिवसेनेच्या परळी शहरप्रमुखपदी वैजनाथ माने यांची निवड

ByND NEWS INIDIA

Jan 8, 2023

बाळासाहेबांची शिवसेनेच्या परळी शहरप्रमुखपदी वैजनाथ माने यांची निवड

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)…

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनेचे प्रमुख नेतृत्व तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये बाळासाहेबांची शिवसेनेच्या (शिंदे गट) परळी शहर प्रमुखपदी येथील वैजनाथ माने यांची निवड करण्यात आली आहे. सदरील निवडीचे पत्र नुकतेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते वैजनाथ माने यांना प्रदान करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार, शिकवण व कार्याचा प्रसार तथा प्रचार करण्यासाठी व बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या बळकटीकरणासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये शिवसेनेच्या परळी शहर प्रमुख पदी शहरातील शिवसैनिक वैजनाथ माने यांची निवड करण्यात आली आहे. सदरील निवडीचे पत्र मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील वर्षा या निवासस्थानी खासदार श्रीकांत शिंदे, सचिव संजय मोरे, बाळासाहेबांची शिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन भैय्या मुळूक व कोअर कमिटी सदस्य अविनाश खापे पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना शिवसेनेचे नवनिर्वाचित शहर प्रमुख वैजनाथ माने यांनी सांगितले की, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तथा शिकवण तळागाळातील सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा मानस व्यक्त करत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, सचिव संजय मोरे जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेनेचे परळी तालुका प्रमुख शिवाजी दादा शिंदे यांच्या सहयोगाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या माध्यमातून समाजातील सामान्य घटकाला न्याय मिळवून देणार असल्याचे व पक्षाच्या बळकटीकरसाठी कार्य करणार असल्याचे यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित शहर प्रमुख वैजनाथ माने यांनी सांगितले. या निवडीबद्दल सर्व स्तरातून वैजनाथ माने यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.