• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

1 लाख 38 हजार 840 रूपयांचे दागिने चोरणारी महिला डी बी पथकाच्या चातुर्यामुळे परळी शहर पोलिसांच्या ताब्यात

1 लाख 38 हजार 840 रूपयांचे दागिने चोरणारी महिला डी बी पथकाच्या चातुर्यामुळे परळी शहर पोलिसांच्या ताब्यात

परळी शहरातील सोन्याचे व्यापारी बालाजी टाक यांच्या सोन्याच्या दुकानात अज्ञात महिलांनी केली दिवसा ढवळ्या चोरी झाल्याची घटने प्रकरणी शहर पोलिसांनी एक महिला आरोपीस गजाआड केले.परळी शहरात सोन्याचे व्यापारी बालाजी टाक यांच्या सोन्याच्या दुकानात अनोळखी तीन महिलांनी जाऊन आम्हाला गंठण घ्यायचे आहे  गंठण दाखवा असे म्हणून अनेक प्रकारचे गंठण पाहिले असता एका महिलेने एक सोन्याचे गंठण ज्याची  किंमत 1लाख 38 हजार 840 रूपयांची चोरी करून घेऊन गेली  तर दोन महिला आमच्याकडे पैसे कमी आहेत आम्ही परत येतो असे दुकानदारला सांगून निघून गेल्या असता दाखवलेल्या गंठणा पैकी एक गंठण कमी असल्याचे समजतात दुकानदाराने अज्ञात महिलेविरोधात परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा नियोजनबद्ध तपास करून जानवी अंगद पवार राहणार रामगव्हाण (बु) नालेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना  येथून चार दिवसाच्या अथक परिश्रमानंतर सदर चोरी केलेल्या आरोपी महिलेला चोरी गेलेल्या  गंठण   मुद्देमालासह परळी शहर डी.बी पथकाने  पकडून  परळी शहर पोलीस स्टेशनला घेऊन आले व कारवाई करुन आरोपी महिलेला परळी न्यायालयात हजर केले असता परळी न्यायालयाने आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे.सदर चोरी प्रकरणाचा कुठलाही पुरावा नसताना  सदरची कामगिरी परळी शहर पोलीस स्टेशनचे डीबी पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे, तुकाराम मुरकुटे ,गोविंद येलमाटे, गोविंद भताने व महिला कर्मचारी डोरले  यांनी आरोपीचा तपास लावला.