• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

परळी वैजनाथ

विद्रोही राष्ट्रसंत जगद्गुरु तुकोबाराय यांची जयंती जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद तालुका शाखा परळीच्या वतीने साजरी करण्यात आली. याचवेळी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्त साहित्य परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
परळी येथील शक्तिकुंज वसाहतीत जगद्गुरु तुकोबारा साहित्य परिषदेचे परळी तालुका शाखाध्यक्ष कवी, गझलकार केशव कुकडे उर्फ मुक्तविहारी यांच्या निवासस्थानी जगद्गुरु तुकोबाराय यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी जगद्गुरू तुकोबारायांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या एकूण जीवनचरित्राचा आलेख मांडण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्ताने साहित्य परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी परळी तालुका शाखा अध्यक्ष केशव कुकडे उर्फ मुक्तविहारी, तसेच बीड जिल्हा कार्याध्यक्ष कवी सिद्धेश्वर इंगोले, प्रसिद्ध कवी तथा निवेदक बा. सो. कांबळे आदी उपस्थित होते.