• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अयोध्येत राम मंदिराचं दर्शन होणार सुरु 

अयोध्येत राम मंदिराचं दर्शन होणार सुरु  : 40 टक्के काम पूर्ण

ND NEWS I

अयोध्येत राम जन्मभूमी मंदिराबाबत  भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. राम मंदिराचं काम वेगाने सुरु असून डिसेंबर 2023 पर्यंत काम पूर्ण होईल. तसेच जानेवारी 2024 च्या मकर संक्रांतीला भगवान राम मंदिरात विराजमान होतील, असा अंदाज आहे. मंदिराबाबत ट्रस्टची दोन दिवसांची बैठक आजपासून आहे. बैठकीपूर्वी मंदिराबाबत ट्रस्टने माहिती दिली आहे. 2024 मकर संक्रांतीच्या दिवशी लाखो भाविक राम मंदिराच्या गर्भगृहात भगवान श्री रामललाचे दर्शन घेतील. त्यामुळेच यावेळी होणारी विश्वस्त बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

एका अहवालानुसार मंदिराचे 40 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. मंदिराचे बांधकाम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. जानेवारी 2024 च्या मकर संक्रांतीला भगवान श्री रामलला विराजमान होणार आहेत. म्हणजेच 2024 मध्ये रामभक्तांची शेकडो वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत मंदिराच्या गर्भगृहाच्या उभारणीच्या कामाच्या आराखड्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत झालेल्या निर्णयांचा अहवाल पीएमओलाही पाठवला जाणार आहे. त्यामुळे माजी आयपीएस अधिकारी आणि बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्यासह 11 सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.