• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

मला जे बोलायचंय ते महाराष्ट्रात बोलेन :अजित पवार

ByND NEWS INIDIA

Sep 11, 2022

मला जे बोलायचंय ते महाराष्ट्रात बोलेन :अजित पवार

वृत्त: राष्ट्रवादीचं  8 वे राष्ट्रीय अधिवेशन  राजधानी दिल्ली इथं पार पडलं. पण हे अधिवेशन अजित पवार  यांच्या नाराजीनाट्यामुळे गाजलं. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात सर्व बड्या नेत्यांनी भाषण केलं. मात्र, अजित पवार यांनी भाषण केलं नाही. अजित पवार यांनी भाषण न केल्याने आता वेगळी चर्चा सुरू आली आहे. अजित पवार आणि जयंत पाटील  यांच्यातील शीतयुद्ध पुन्हा एकदा दिसून आलं. हे राष्ट्रीय अधिवेशन अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या शक्तीप्रदर्शनाचं केंद्र बनलं होतं.
‘दुसरं स्टेशन येईल…’
‘अजित दादांना बोलू द्या…’ जोरदार घोषणाबाजी अजित पवार समर्थकांनी सुरू केली. तर दुसरीकडे जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी सुरू केली. वातावरणात तणाव निर्माण झाला. हा तणाव निवळण्यासाठी प्रफुल्ल पटेलांनी पुन्हा हातात माईक घेतला आणि एक स्टेशन गेल्यावर दुसरे स्टेशन येईल असं सांगून सर्व कार्यकर्त्याना शांत राहण्याचं आवाहन केलं. जेंव्हा जयंत पाटलांचं भाषण सुरू झालं तेंव्हा अजित पवार व्यासपीठावरून उठले आणि थेट बाहेर पडले.
त्यांना बोलवण्यासाठी प्रवक्ते रविकांत वरपे निघाले. त्यांनी अजित पवारांना बोलवून आणलं. अजित पवार व्यासपीठावर येऊन बसले. त्यानंतर काही वेळातच जयंत पाटील यांचं भाषण संपलं. तेंव्हा पुन्हा प्रफुल्ल पटेलांनी अजित पवाराचं नाव पुकारले. तर अजित पवार उठून बाहेर गेले. त्यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे पण बाहेर पडल्या. तेंव्हा अजित पवार समर्थकांनी मोठा गोंधळ घातला. ‘अजित दादा इथे बसून होते. तुमच्या आग्रहाखातर अजित दादांना बोलण्याची विनंती केली पण ते निघून गेले. पण शरद पवारांच्या  समारोपाच्या भाषणापूर्वी अजित दादांचे भाषण होईल,’ असं आश्वासन देऊन कार्यकर्त्यांना शांत केलं.
यावरती अजित पावर यांनी
‘बरीच भाषणं झाली … सर्व दिग्गज बोलले… मला जे बोलायचंय ते महाराष्ट्रात बोलेन, असं उत्तर दिलं