• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

आता औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ !

◼️औरंगाबाद, उस्मानाबादचं नामांतराला केंद्राची मंजुरी;

ND NEWS

औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर करण्यात आले असून राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. आता औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण करण्यात आले आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिली. तसेच त्यांनी केंद्र सरकारच्या मंजुरीचे पत्रही ट्विट केले आहे. केंद्राची मंजुरी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेला औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय अयोग्य असल्याचे म्हणत शिंदे सरकारने पुन्हा आपल्या कॅबिनेटमध्ये शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला. राज्य सरकारने या दोन शहरांचा नामांतराचा निर्णय घेतला व हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला. त्यानंतर काही महिन्यातच या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिली आहे.देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या मंजुरीबाबत एक ट्विट केले. त्यात त्यांनी करुन दाखवले असे म्हटले आहे. “औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे कोटी कोटी आभार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…!”