• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

किल्ले रायगड येथे छत्रपती क्रांती सेनेतर्फे ३४८ वा शाक्त शिवराज्याभिषेक वर्धापन दिन सोहळ्याचे २४ सप्टेंबरला आयोजन…

ByND NEWS INIDIA

Sep 23, 2022

किल्ले रायगड येथे छत्रपती क्रांती सेनेतर्फे ३४८ वा शाक्त शिवराज्याभिषेक वर्धापन दिन सोहळ्याचे २४ सप्टेंबरला आयोजन…

प्रतिनिधी: रेश्मा माने

छत्रपती क्रांती सेना शाक्त राज्याभिषेकाचा वर्धापन दिन साजरा करणार
आशिष जाधव जिल्हा संयोजक रायगड यांनी दिली माहिती
छत्रपती क्रांती सेनेच्या वतीने 2018 पासुन रायगडावर  शाक्त राज्याभिषेकाचा वर्धापन दिन रायगडावर साजरा करत आहे. यावर्षी सुद्धा मोठी तयारी करण्यात आली आहे. यावर्षी प्रशासकीय स्तरावर सुद्धा  हा सोहळा साजरा होत आहे ही मोठी जमेची बाजू आहे. प्रशासनाच्या व्यतिरिक्त कोणत्याही इतर संघटनांना यावेळी रायगडावर कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात आली नाही.
राज्यभरातून छत्रपती क्रांती सेनेचे पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा दाखवत असल्याने रायगडावरील कार्यक्रम ठिकाण बदलून सदर कार्यक्रम राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ समाधी स्थळाच्या बाहेर  सकाळी ११ ते २ यावेळेत घेण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटक प्रसिद्ध इतिहास तज्ञ  ॲड.अनंत दारवटकर असून प्रमुख मार्गदर्शक सप्रसिद्ध वक्ते प्रा. यशवंत गोसावी व प्रा. सुनील देवरे आहेत.या कार्यक्रमासाठी प्रमुख  सुधाकर लाड शाक्त शिवराज्याभिषेक समारोह समिती रायगड , अनेक तुषार दादा वाघ नाशिक तसेच लक्ष्मण पाटील जळगाव विनोद अण्णा भोसले परभणी वक्ते म्हणून संबोधित करणार आहेत तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सर्व श्री ह भ प पुंगळे महाराज रायगड दत्ता महाराज ढोणे मुळशी पवार शास्त्री देऊ जालिंदर महाराज केरे औरंगाबाद तसेच कॅप्टन मनोहर जाधव रायगड समीर सदानंद मालगुणकर उद्योजक साधली ढोकले शाखा सेवा संस्था अध्यक्ष माननीय अनिल ढवळे सरपंच रायगड गणेश बाबू अवकीरकर उपसरपंच निजामपूर भारत दिघोळे अध्यक्ष कांदा उत्पादक संघटना महाराष्ट्र राज्य मोहन गवंडी सरपंच पळस ते प्राध्यापक अजित खरसडे श्रीगोंदा ते उपस्थित राहणार आहेत ही मान्यवर मंडळी उपस्थित राहण्यार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संरक्षक बाळासाहेब मिसाळ पाटील राहणार आहेत.
या कार्यक्रमात  १.ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण मिळू शकते असा एक मात्र पर्याय मराठा आरक्षणासाठी आहे काय एक चिंतन, २.छत्रपती शिवाजी महाराजांचा शाक्त राज्याभिषेक लोक उत्सव होणे काळाची गरज एक चिंतन, ३.शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे प्रासंगिकता एक चिंतन या तीन  विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
सदर कार्यक्रम लोकोत्सव व्हावा अशी संघटनेची भूमिका असताना यावेळी प्रशासन स्तरावर हा सोहळा करण्यात येत आहे त्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पण प्रशासनाने सामाजिक संघटनांना सुद्धा परवानगी दिली पाहिजे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आशिष जाधव जिल्हा संयोजक रायगड यांच्याकडून करण्यात आले.