• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

दिल्लीत ऑपरेशन लोटसचा आरोप ? केजरीवाल यांच्या बैठकीला आम आदमी पार्टीचे आमदार गैरहजर, संपर्कातही नाहीत

ByND NEWS INIDIA

Aug 25, 2022

 

ND NEWS: आपचे नेते संजय सिंह यांच्याकडून दिल्लीत ऑपरेशन लोटसचा आरोप करण्यात आला आहे. आपच्या आमदरांना भाजपाकडून ऑफर येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दिल्लीत ऑपरेशन लोटसबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर आम आदमी पार्टीच्या आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थआनी सुरु झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीला 8 आमदार अजून पोहचलेले नाहीत. त्यानंतर आपच्या वरिष्ठ नेत्यांनी सगळे आमदार लवकरच बैठकस्थानी पोहचतील अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.भाजपाकडून आपचे 40 आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येतो आहे.