• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

नेपाळ कल्चरल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये रानबा गायकवाड लिखित आणि प्रा. सिध्दार्थ तायडे दिग्दर्शित “पाण्याखालचं पाणी” लघुचित्रपटाची निवड

ByND NEWS INIDIA

Aug 16, 2022

नेपाळ कल्चरल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये रानबा गायकवाड लिखित आणि प्रा. सिध्दार्थ तायडे दिग्दर्शित “पाण्याखालचं पाणी” लघुचित्रपटाची निवड

ज्येष्ठ साहित्यीक व पत्रकार रानबा गायकवाड लिखीत आणि प्रख्यात सिने-नाटय अभिनेता-दिग्दर्शक प्रा. सिध्दार्थ तायडे दिग्दर्शित “पाण्याखालचं पाणी”या लघुचित्रपटाची नेपाळ कल्चरल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या अंतिम फेरीत जगभरातील ३४ देशातील लघुपटातून निवड करण्यात आली आहे.नेपाळ देशातील सांस्कृतिक राजधानी म्हणून परिचित असलेल्या काठमांडू येथे 8 डिसेंबर रोजी हा महोत्सव संपन्न होणार आहे. प्रा. सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित पाण्याखालचं पाणी हा लघुपट जगभरातील नामांकित महोत्सवात अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन या लघुपटाची निर्मिती करण्यात आली होती.

वास्तवावर आधारित असलेल्या या लघुपटाची निर्मिती-कथा-पटकथा-
संवाद प्रसिद्ध साहित्यिक रानबा गायकवाड यांची असून प्रख्यात सिने-नाट्य अभिनेता -लेखक- दिग्दर्शक प्रा. सिध्दार्थ तायडे यांनी दिग्दर्शन केले आहे . सिनेमोटोग्राफी मनोज आलदे, स्थिर चित्रण अ‍ॅड. कपिल चिंडालीया, अजय पवार ,छाया-संकलन शरद शिंदे यांनी केले आहे. रंगभूषा -बालाजी कांबळे, कोमल गायकवाड, वेशभूषा- राजन तारू , गंगाधर क्षिरसागर, प्रकाशयोजना प्रा.मारोती कांबळे यांनी केली आहे.घोटभर पाण्यासाठी दुष्काळात होरपळणार्‍या जीवांचा आकांत या निमित्ताने प्रेक्षकांसमारे वास्तव रुपात प्रा. सिध्दार्थ तायडे यांच्या सर्जनशील दिग्दर्शनातून समोर आला आहे.
लघुपटाच्या कायदेशीर सल्लागार म्हणून अ‍ॅड. सविता तायडे यांनी कामकाज पाहिले.
या लघुपटात सिने-नाटय कलावंत निवृत्ती खंदारे, शेख गणी, देविदास बोकण ,नागनाथ बडे, एन.के.सरवदे, बालाजी कांबळे यांच्यासह वंदना लोखंडे, निर्मला सिरसाठ, चंदा चांदणे, कु. सायली क्षीरसागर, पंचशिला गायकवाड, सिध्दांत लांडगे, विकास वाघमारे, विनायक काळे, कुणाल पुसे, विद्याधर सिरसाठ, शिवकुमार लुले, गंगाधर क्षीरसागर, दिनेश आंधळे आदि कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत.

या लघुपटास आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त प्रसिद्ध सिने- नाट्य लेखक-दिग्दर्शक डॉ.अनिलकुमार साळवे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले
आहे.माजी आमदार शिवाजीराव चोथे, प्राचार्य आर. के. परदेशी,डॉ. संभाजी चोथे,विनायक चोथे,प्रा. प्रमोद जायभाये, डॉ. राजू सोनवणे, गोरख चोथे यांच्यासह, सिल्व्हर ओक फिल्म अँड एंटरटेनमेंटचे निर्माता मनोज कदम,अमृत मराठे,डॉ. सतीश पावडे, डॉ.गणेश चंदनशिवे,डॉ. संजय पाटील,डॉ. अशोक बंडगर,प्रा. स्मिता साबळे,डॉ. मंगेश बनसोड,प्रा. किशोर शिरसाठ, डॉ. संपदा कुलकर्णी,डॉ. वैशाली बोदेले,डॉ. संजीवनी साळवे, डॉ. धनंजय वडमारे,प्रा. गजानन दांडगे,डॉ. संजय पाईकराव,
बाजीराव धर्माधिकारी, साहित्यीक आबासाहेब वाघमारे, मसापचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, ए.तु. कराड,प्रदीप भोकरे,प्रा. विलास रोडे, गोपाळ आंधळे,मोहन व्हावळे,सिध्दार्थभाऊ हत्तीआंबीरे,प्रोफेसर डॉ. संजय जाधव,डॉ. राजेश इंगोले, डॉ. प्रवीण खरात,प्रा. विनोद लांडगे,प्राचार्य डॉ. अरुण दळवे, डॉ. मुंजाभाऊ धोंडगे,डॉ. बळीराम पांडे,डॉ. गणेश शिंदे,
प्राचार्य अरुण पवार, डॉ. राजकुमार यल्लावाड ,प्रा.डॉ. माधव रोडे, प्रा. डॉ. चंद्रकांत जोगदंड,बा. सो. कांबळे, सिद्धेश्वर इंगोले,ब्रम्हानंद कांबळे, दिवाकर जोशी,आसिफ अन्सारी,डॉ. सय्यद अमजद, प्रा.रवींद्र जोशी,भगवान साकसमुद्रे,अ‍ॅड.
दिलीप उजगरे, प्रा.विक्रम धनवे,डॉ. रमेश इंगोले,बालासाहेब इंगळे,दादासाहेब कसबे ,संतोष पोटभरे,डॉ. बबन मस्के, शंकर सिनगारे,पत्रकार महादेव गोरे,शशिकांत कुलथे,मदन ईदगे ,डॉ. संतोष रणखांब,किशोर दहिवाडे,साहित्यिक, पत्रकार, कलावंत आदींनी रानबा गायकवाड , प्रा. सिद्धार्थ तायडे आणि यशस्वी टीमचे अभिनंदन केले आहे.