• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

प्रा.टी.पी.मुंडे यांच्या हस्ते जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात ध्वजारोहण संपन्न!

 

ND NEWS :

परळी वैजनाथ प्रतिनिधी

परळी येथील वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे जवाहरलाल नेहरू वरिष्ठ महाविद्यालयात वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.टी.पी.मुंडे(सर) यांच्या शुभहस्ते तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण करण्यात आले सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी ,घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वतंत्र भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष संबंध देशभरामध्ये मोठ्या थाटात साजरा झाले. त्यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले त्याचाच भाग म्हणून महाविद्यालयात ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी संबंध जनतेला त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षाच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे सचिव भिसाराम राठोड, प्रा.के.आर बंग,प्रा. जी.एम अवस्थी, जनार्दन गाडे गुरुजी, पी.आय. सुरेश चाटे,सुधीर फुलारी सर, प्रा.नरहरी काकडे, महेश बँकेचे उपाध्यक्ष शिवरत्न काका मुंडे, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय ढवळे, महेश बँकेचे संचालक ओम सारडा, अनिल मस्के, सुदाम लोखंडे, भीमराव मुंडे ,विनायक गडदे ,बाबा शिंदे, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे, डॉ.माणिक कांबळे,महाविद्यालयाचे प्राचार्य बी डी मुंडे, अँड. संजय जगतकर, जमील भाई, फारुख भाई, मिलिंद क्षीरसागर, महेश बँकेचे कार्यकारी अधिकारी उपाध्ये साहेब,नितीन शिंदे,इलियास भाई, जम्मू सेठ, श्याम गडेकर, रघुनाथ डोळस, नागेश व्हावले , नवनाथ क्षीरसागर, सगीर भाई,दीपक फड, अँड.मनोज संकाये, राहुल कांदे, शिवा बडे ,किशोर जाधव, मेहबूब कुरेशी, मुक्तार भाई ,चांद भाई, मेहमूद भाई,नूरबानुखाला, बबलू सय्यद, नितीन फड, सय्यद जायेद, नितीन ढाकणे,आदीसह महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.