• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

CCTV फुटेजमुळे विनायक मेटे अपघात प्रकरणाला वेगळे वळण येऊ शकते

ByND NEWS INIDIA

Aug 17, 2022

ND NEWS:
विनायक मेटे यांच्या भाच्याने गंभीर आरोप केले आहेत. मेटेंच्या भाच्याने त्यांचा चालक एकनाथ कदमांवर संशय व्यक्त केला आहे. टोलनाक्यावर सीसीटीव्हीत चालक कोणाशी तरी फोनवर बोलतोय. कारचा स्पीडलिमीटही कमी जास्त होत होता. त्यामुळे आमचा संशय बळावला आहे. चालत फोनवर कोणाशी बोलत होता त्याची चौकशी केली जावी अशी मागणी त्यांच्या भाच्याने केली आहे.
एका CCTV फुटेजमुळे विनायक मेटे अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. विनायक मेटेंसह कारमध्ये उपस्थित असलेला ड्रायव्हर फोनवर कुणाशी तरी फोनवर बोलत असल्याचे या CCTV फुटेजमध्ये दिसत आहे. शिक्रापूर रस्त्यावरील हे सीसीटीव्ही फुटेज आहे. या शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजमधील संभाषणाचा तपास केल्यास सत्य बाहेर येईल असा दावा विनायक मेटे यांच्या नातेवाईकाने केला आहे.
विनायक मेटे यांच्या भाच्याचे गंभीर आरोप
विनायक मेटे यांच्या भाच्याने गंभीर आरोप केले आहेत. मेटेंच्या भाच्याने त्यांचा चालक एकनाथ कदमांवर संशय व्यक्त केला आहे. टोलनाक्यावर सीसीटीव्हीत चालक कोणाशी तरी फोनवर बोलतोय. कारचा स्पीडलिमीटही कमी जास्त होत होता. त्यामुळे आमचा संशय बळावला आहे. चालत फोनवर कोणाशी बोलत होता त्याची चौकशी केली जावी अशी मागणी त्यांच्या भाच्याने केली आहे. हा घातपात आहे की अपघात याची चौकशी करा एवढीच आमची मागणी असल्याचेही तो म्हणाला.