• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

महाराष्ट्र शासनाने विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे आणि शालेय स्तरावरील.

ByND NEWS INIDIA

Jun 25, 2021

दहावी-बारावीच्या परीक्षा न झाल्यामुळे त्यांचे शैक्षणिक शुल्क परत करावे, शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे तात्काळ वाटप करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परळी वैजनाथ शाखेच्या वतीने करण्यात आली.
मागील दीड वर्षांपासून शाळा,महाविद्यालयांमध्ये कोविड १९ च्या परिस्थितीमुळे कोणत्याही प्रकारच्या ऑफलाईन तासिका, प्रात्यक्षिक, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा इतर कोणत्याही प्रकारचे उपक्रम झाले नाहीत. याच काळात लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे, पालकांचे उत्पन्नाचे मार्ग बंद, झालेले असल्यामुळे आणि विद्यापीठ परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे तत्काळ वाटप करण्यात यावे असे निवेदन खा.डॉ.प्रितमताई मुंडे आणि वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के.ईप्पर सर यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. या निवेदनाच्या प्रती मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांना देखील पाठवण्यात आल्या आहेत.
या वेळी रासेयो चे डॉ.माधव रोडे,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे शहरमंत्री वाघेश्वर मोती, सहमंत्री पांडुरंग गित्ते, महाविद्यालय अध्यक्ष दिपक दहिफळे, तसेच कार्यकर्ते अक्षय गिरी, मंगेश कांदे, तुषार पदमपल्ले, अभिषेक वाळके इत्यादी उपस्थित होते.