• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*माळेगाव ते लोखंडी सावरगाव रस्ता तात्काळ दुरुस्ती करा – संभाजी ब्रिगेड च्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी*

ByND NEWS INIDIA

Jun 26, 2021

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे*

 

केज तालुक्यातील माळेगाव ते लोखंडी सावरगाव हा राज्यमार्ग तात्काळ दुरुस्ती करून घ्यावा असे मागणीचे निवेदन दि. २५ जून शुक्रवार रोजी संभाजी ब्रिगेड च्या वतीने केज तहसीलदार यांना दिले

सविस्तर वृत्त असे की माळेगाव ते लोखंडी सावरगाव रस्ता मागील अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने नागरिकांना दळणवळणासाठी तसेच संबंधित रस्त्यालगत असलेल्या तालुक्यातील तसेच अंबाजोगाई तालुक्यातील बऱ्याच गावांना हा मुख्य रस्ता असून यावर सिरीयस तसेच डिलिव्हरी पेशन्ट यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागत असून या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण देखिल अधिक झाले आहे

 

त्यामुळे संबंधित रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे

 

या निवेदनावर संभाजी ब्रिगेड विभागीय उपाध्यक्ष विलास गुंठाळ, तालुका अध्यक्ष राहुल खोडसे, वि. आघाडी अध्यक्ष संदीप शितोळे, तालुका संघटक अमर धपाटे,सुरज चौधरी, दादा चव्हाण, अमर शेख इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.