• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

पंकजाताईंच्या नेतृत्वात भाजपचा राज्यभर चक्काजाम

ByDeepak Gitte

Jun 25, 2021

पंकजाताईंच्या नेतृत्वात भाजपचा राज्यभर चक्काजाम

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

ND NEWS | परळी- दि.२५-पंकजाताईंच्या नेतृत्वात भाजपचा राज्यभर चक्काजाम परळीत खा.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणार तीव्र आंदोलन आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा ; तालुकाध्यक्ष सतीश मुंडे,शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांचे आवाहन. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी शनिवार दि.२६ जून रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यात एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या सूचनेनुसार परळी भाजप आंदोलन करणार आहे,खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष सतीश मुंडे आणि शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर स्थगिती आली आहे,सरकारच्या उदासीनतेमुळे झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,ओबीसींच्या आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. तालुक्‍यात धर्मापुरी,सिरसाळा व परळी शहरात छत्रपती संभाजी राजे चौक (इटके कॉर्नर ) येथे आंदोलन करण्यात येणार आहे परळी शहरातील छत्रपती संभाजी राजे चौक (इटके कॉर्नर ) येथील आंदोलनाचे नेतृत्व खा.डॉ.प्रितमताई मुंडे या करणार आहेत, सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरुवात होणार असून परळी तालुक्यातील व शहरातील भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,ओबीसी संघटना आणि समाज बांधव सहभागी होणार असल्याचे श्री.मुंडे आणि लोहिया यांनी सांगितले. •••