• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

पिंपळगाव गाडे येथे बुद्ध जयंती व माता रमाई स्मृती दिन साजरा

ND NEWS

सिरसाळा प्रतिनिधी

परळी तालुक्यातील पिंपळगाव गाडे येथे विश्ववंदनिय शांतिदुत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त वैशाखी पोर्णिमे दिनी व माता रमाई आंबेडकर स्मृतिदिन 27 मे रोजी  साध्या पद्धतीने विविध कार्यक्रम संपन्न.

बुद्ध जयंती निमित्त बुद्ध प्रतिमा पूजन , बुद्ध वंदना तसेच खिरदान करण्यात आले तर माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करुन गाढे पिंपळगाव ता परळी येथील स्मशानभूमीत बोधिवृक्षाचे रोपण करण्यात आले . यावेळी बोधिसत्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन रणखांबे,ऑल इंडिया पॅंथर सेनेचे परळी ता. महासचिव विनोद घुंबरे,सुरज घागरमाळे, सिध्दार्थ घुंबरे, नितीन रोडे,हर्षद घुंबरे, प्रदिप घुंबरे, योगेश जगताप आणि रंजित घुंबरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संविधान मित्र मंडळ गाढे पिंपळगाव यांनी केले होते.