• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

बीड- गेवराई तालुक्यातील धोंडराई कोव्हीड सेंटरमध्ये केले फळांचे वाटप .. आमची आई धोडंराई या गावकऱ्यांनी उभारले कोविड सेटर सुस्त उपक्रम

ByND NEWS INIDIA

May 27, 2021

गणेश ढाकणे :गेवराई प्रतिनिधी

ND NEWS :- AC – सध्या सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातलेले असून समाजातील काही व्यक्ती , सामाजिक कार्यकर्ते, आणी अनेक लोक कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले दिसतात असे असताना मात्र वाढती कोरोना संख्या पाहुन अनेक ठिकाणी कोव्हीड केअर सेंटर सुरू केलेले आहे तालुक्यातील धोंडराई येथे देखील भुमीपुत्रांनी कोरोना सेंटर सुरू केले आहे अत्यंत प्रशिस्त निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या कोव्हीड सेंटर मध्ये सध्या रुग्ण उपचार घेत असुन दोघांना डिस्चार्ज ही झालेला आहे धोंडराई कोव्हीड सेंटर मध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या सेवेसाठी गावातील मंडळी नेहमी सतर्क आहे कोव्हीड सेंटर जरी छोटे असले तरी आमदार निलेश लंके यांच्या भाळवणी येथील कोव्हीड सेंटर प्रमाणे सेवा देण्याचे काम धोंडराई येथील आपली आई धोंडराई ग्रुप चे सदस्य करतात.

Vo – कोव्हीड सेंटर मधील रुग्णांना नास्ता असो किंवा काही उपयोगी वस्तू गरज भासली की गावातील कोणी ना कोणी भुमीपुत्र धावत मदत करतो. यातच काल बुधवार ( २६) रोजी गावाचे भुमीपुत्र बीड कोषागार कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असणारे अशोकराव साखरे साहेब धोंडराईतील प्रगतशील शेतकरी गोकुळ मेघारे,अरुण मेघारे यांच्या वतीने धोंगराई येथील कोव्हीड सेंटर ला फळांची ,टरबुजांचे वाटप करण्यात आले यावेळी कोव्हीड सेंटर मध्ये असलेल्या रुग्णांनी याठिकाणी योग्य सोय होत असल्याचेही सांगितले आहे‌.फळांची वाटप केल्याने एका अर्थाने कडक उन असताना मात्र टरबुज फळाच्या माध्यमातून त्यांना माणुसकीचा गारवा अनुभवायला मिळाला.यावेळी अशोकराव साखरे , गोकुळ मेघारे, धर्मराज करपे,जफर काझी, परमेश्वर कोरडे ,सुनील जाधव,भागवत टेकाळे उपस्थित होते.
सोमनाथ मोटे शाम जाधव
गेवराई प्रतिनिधी गणेश ढाकणे