• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

लाॅकडाऊनमुळे आत्महत्या वाढण्यापूर्वीच सरकारने निर्बंध उठवावेत -रानबा गायकवाड

ND NEWS

परळी ( प्रतिनिधी ) गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार प्रचंड आर्थिक संकटात सापडला बेकारी व बेरोजगारी यामुळे आत्महत्या होत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने लावलेले निर्बंध एक जूनपासून उठवणयाची मागणी जेष्ठ पञकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट आता नियंत्रणात आली आहे. लाॅकडाऊन, कठोर निर्बंध यामुळे नागरिकांचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. तर हजारो कोरोनाचाया आजाराने लुटले गेले आहेत.शहर तसेच ग्रामीण भागातही बेरोजगारी वाढली आहे. काम नसल्याने घर प्रपंच कसा चालवायचा हा यक्ष प्रश्न सर्वसामान्यापुढे पडला आहे. तसेच अन्नधान्य, डाळी, तेल याचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाई रोखण्यात केंद्र आणि राज्य सरकारला अपयश आले आहे.
आर्थिक संकटात सापडल्याने घर चालवणे अवघड झालेल्या तरुणांच्या आत्महत्या होत आहेत. या मध्ये वाढ होऊन एक नवीन संकट निर्माण होण्याचा धोका आहे. शासनाने घालून दिलेले कोरोनाचे नियम जनतेने पाळलयाने रुग्ण संख्या कमी झाली आहे. मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या लसीकरणाचाही फायदा होत आहे.
लक्षणे असतील त्यांच्या चाचण्या जरूर कराव्यात पण कोरोनाच्या नावाने गरीब भरडला जाऊ नये. त्यामुळे राज्य शासनाने एक जूनपासून लावलेले कठोर निर्बंध उठवून जनजीवन सुरळीत करावे असेही गायकवाड यांनी म्हटले आहे.