• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

ग्रामीण भागात विभाग वर लसीकरण न करता  प्रत्येक गावात लसीकरण मोहीम सुरू करा अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू   – राजेश गिते

ByDeepak Gitte

May 6, 2021

ग्रामीण भागात विभाग वर लसीकरण न करता  प्रत्येक गावात लसीकरण मोहीम सुरू करा अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू   – राजेश गिते
ND NEWS | दि.०६-परळी वैजनाथ तालुका ग्रामीण भागात सध्या कोरोनाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.कोरोना मुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे.मधल्या काळात काही गावांमध्ये अल्प प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
लसीकरण करण्यासाठी ग्रामीण भागात गावोगावी लोक लसीकरण केंद्र या ठिकाणी जात होती.प्रशसनाने नंतर लस तुटवडा असल्याचे कारण सांगून लसीकरण मोहीम बंद केली.आज च्या परिस्थिती गावोगावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.प्रशासन मोठ्या गावात जसे नागापूर, धर्मापुरी, सिरसाळा,आशा ठिकाणी बर्याच गावातील लोकांना बोलवुन लसीकरण मोहीम राबवित आहे ज्या मुळे एकाच ठिकाणी लोकांची गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होतो आहे.
प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित बंद केलेली लसीकरण मोहीम गावोगावी पुन्हा सुरू करावी अन्यथा आमच्या नेत्या भाजपा राष्ट्रीय सचिव मा पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष खा डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील लोकांना घेऊन प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपा नेते राजेश गिते यांनी दिला आहे.