• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

लोकसंख्येची व्याप्ती पहाता शिवाजीनगर भागात लसिकरण केंद्र सुरु करा – निळकंठ चाटे

ByDeepak Gitte

May 6, 2021

लोकसंख्येची व्याप्ती पहाता शिवाजीनगर भागात लसिकरण केंद्र सुरु करा – निळकंठ चाटे

प्रतिनिधी – दिपक गित्ते

ND NEWS |दि.०६- परळी शहरात सध्या कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असुन  तीनच लसिकरण केंद्र असल्याने याठिकाणी नागरीकांची मोठी गर्दी होत आहे. लसिकरणासाठी होणारी गर्दी विभागुन नागरीकांना त्रासाविना लस मिळावी यासाठी शिवाजीनगर नागरी आरोग्य केंद्रात लसिकरण केंद्र व कोरोना उपचार सुरु करावेत अशी मागणी भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी केली आहे.
परळी शहरातील नागरीकांसाठी सध्या सावतामाळी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र,नटराज रंग मंदिर व  थर्मल कॉलनी दवाखाना या तीनच ठिकाणी लसिकरण केंद्र सुरु आहे.शहराची लोकसंख्या एक लाखापेक्षा अधिक असुन यापैकी काही हजारच लोकांचे लसिकरण झालेले आहे.यामुळे बहुतांश परळीकर जनता कोरोना लसिपासुन वंचित आहे.शहरात अगोदरच कमी लसिकरण केंद्र असुन त्यात लसिंचा तुटवडा जाणवत आहे.परळी शहरातील शिवाजीनगर भागात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पाच वर्षापुर्वी नागरी आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले होते परंतु सध्या हे नागरी आरोग्य केंद्र बंद असुन यामुळे या भागातील नागसेन नगर,शिवाजी नगर,इराणी वस्ती आशोक नगर आबेडकर नगर या भागातील नागरीकांना उड्डाणपुल ओलांडुन उपजिल्हा रुग्णालयात किरकोळ उपचारासाठी यावे लागत आहे.सध्या परळी शहरात कोरोनाने थैमान घातले असुन स्थानिक प्रशासन कोरोना प्रसार रोखण्यासाठी अपयशी ठरत आहे.शिवाजीनगर भागातील लोकसंख्या पहाता या ठिकाणी असलेले नागरी आरोग्य केंद्र त्वरीत सुरु होवुन तेथे लसिकरण केंद्र सुरु होणे गरजेचे आहे.यासाठी आमच्या नेत्या भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्यामार्फत आरोग्य प्रशासनाशी संपर्क करुन शिवाजीनगर भागातील या नागरी आरोग्य केंद्रात लसिकरण केंद्र सुरु करणार असल्याचेही भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी म्हटले आहे.