• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

सामाजिक कार्यकर्ते बिपीन घोरपडे यांच्या मातो:श्री सरस्वती घोरपडे यांचे निधन

ByND NEWS INIDIA

May 2, 2021

गेवराई दि. 2 : वार्ताहर : सामाजिक कार्यकर्ते ईजि. बिपीन घोरपडे यांच्या मातु:श्री सरस्वतीबाई एकनाथ घोरपडे ( वय वर्ष 55 ) रा. खेसे पार्क- पुणे, यांचे अल्पशा आजाराने शनिवार ता. 1 रोजी जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. शनिवारी दुपारी त्यांना श्वसनाचा त्रास झाल्याने, पुणे येथील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू , उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रविवार ता. 2 रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाज बांधव उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती, चार मुले, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.