• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*उपकेंद्र निहाय कोविड लसीकरण सुरू करा – पुरोगामी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्षद त्तात्रय मुजमुले यांची मागणी* ——-

ByND NEWS INIDIA

Apr 30, 2021

——————————————————-

*कामाचे विकेंद्रीकरण करणे काळाची गरज*

केज-प्रतिनिधी :- संपूर्ण राज्यासह महाराष्ट्राला कोरोना महामारीने विळख्यात घेतले आहे त्यामुळे देशभर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा ही लाट खूप तीव्र स्वरूपाची असून दिवसेंदिवस रूग्न संख्या वाढतच चालली आहेत.शहरासह आता ग्रामीन भागात कोरोनाचा उद्रेक होऊन गावाच्या गाव कोरोनामय होत चालली आहेत.बीड जिल्ह्यात दररोज चा आकडा दीड हजाराच्या आसपास जात आहे त्यामुळे गंभीर्याची बाब होत आहे. प्रशासन कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी ब्रेक दि चैन मोहिमेंतर्गत राज्यात लॉकडाउन करत आहे मात्र नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मोकाट फिरताना दिसून येत आहे त्यामुळे प्रशासन हतबल होत आहे व आरोग्य प्रशासनावर याचा ताण पडतो आहे.त्यामुळे सध्या राज्यात कोरोना आजारावरील कोरोना लसीचे लसीकर चालू आहे त्याचा चांगला परिणाम दिसून येत असून मृत्यू दर कमी होण्यास व रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होत आहे.परंतु या सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रानिहाय कोव्हीड लसीकरण चालू आहे. आरोग्य केंद्रानिहाय भरपूर गावे येत असल्याने केंद्रावर गर्दी होत आहे व त्याचा आरोग्य यंत्रणेवर देखील ताण पडतो आहे आणि विशेष म्हणजे गावोगावचे नागरिक एकत्र जमल्याने तेथेही संक्रमनाचा धोका निर्माण होत आहे. काही गावात जास्तीचे रुग्ण आहेत तर काही ठिकाणी अल्प अथवा कमी आहेत तसेच सध्या जेष्ठ नागरिकांसह शुगर रक्तदाब असणाऱ्या पेंशटना प्रवास करून 15,20 किलोमीटर जावं लागतं आहे.त्याचबरोबर 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वाना लस देणार आहे त्यामुळे तर तोबा गर्दी होणार त्यामुळे लसीकरणाच्या नादात कोरोना संक्रमनाची भीती नागरिक व्यक्त करत आहेत व कामाचे विकेंद्रीकरण करणे काळाची गरज आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र निहाय कोरोना लसीकरण करून प्रशासनावरील कामाचा ताण,लोकांची होणारी गैरसोय व कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागाने उपकेंद्र निहाय लसीकरण करावे अशी मागणी पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय मुजमुले यांनी केली आहे.