• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करा- कॉ. अजय बुरांडे

ByDeepak Gitte

Apr 28, 2021

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करा- कॉ. अजय बुरांडे

लसिचा पुरवठा सुरळीत करा

प्रतिनिधी- अमोल वाघमारे

ND NEWS | दि.२८- तालुक्यातील ग्रामीण भागातील रूग्नांच्या सोयीसाठी व तालुक्याच्या ठिकाणी येणारा भार कमी करण्यासाठी तालुक्यातील पाच ही प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.
परळी तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रूग्नाची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. तालुक्याच्या ठिकाणी येउन कोरोणा तपासणी करूण घेण्यात उपचार करूण घेण्यासाठी रूग्न टाळाटाळ करत आहे. परिणामी अनेक गावात रूग्न संख्या दररोज वाढत आहे. ग्रामीण भागातील रूग्नांना सोयीचे व जवळचे ठिकाण हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तालुक्यातील मोहा, सिरसाळा, पोहनेर, नागापुर व धर्मापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे भव्य वास्तुत आहेत. सर्व सोयीनीयुक्त असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ कोविड सेंटर सुरू करावे. नागरिक लसिकरणासाठी पुढे येत असताना लसीचा पुरवठा सुरळीत करावा, तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड तपासणी सुरू करावी अशी मागणी किसान सभेचे नेते कॉ.अजय बुरांडे, पमचायत समिती सदस्य कॉ.सुदाम शिंदे, कॉ. मुरलीधर नागरगोजो, कॉ. बालासाहेब कडभाने, कॉ.मदन वाघमारे, कॉ पप्पु देशमुख, कॉ. मनोज देशमुख, विशाल देशमुख, मनोज स्वामी यांनी केली आहे.