• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्यावतीने जनविरोधी कायद्यांच्या विरोधात राष्ट्रपतींना निवेदन.

ByND NEWS INIDIA

Apr 29, 2021

ऍड विवेक वानखेडे
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

ND NEWS |: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने 29 कामगार कायदे रद्द करून नवीन तयार झालेले 4 कामगार विरोधी काळे कायदे,नवीन पेन्शन कायदा,तीन शेतकरी विरोधी कायदे,नवीन शिक्षण नीती 2020,तसेच केंद्र व राज्य कर्मचारी यांना पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा कायदा तसेच कंपन्यांचे खाजगीकरण करणारा कायदा या विविध कायद्याच्या विरोधात मा.राष्ट्रपती यांना संपूर्ण भारतातील 31 राज्यांमधून 5000 तालुक्यातुन एकाच वेळी काळी फीत लावत भारतीय संविधानाच्या कलम 19 नुसार अधीन राहून सर्व नियमांचे पालन करत केंद्र व राज्यातील विविध शासकीय-निमशासकीय विभागातील, खाजगी कर्मचारी तथा कामगार यांनी तसेच विवीध विद्यार्थीसंघटना, बेरोजगार संघटना,युवा संघटना यांनी दि.19एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान संपूर्ण भारतात काळी फीत लावून आंदोलन केले. तरीही दिनांक 26 एप्रिल पर्यंत अद्यापही कोणताही निर्णय घेतला नाही तेव्हा राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ,तालुका संग्रामपूर यांनी मा.राष्ट्रपती यांना मा.तहसीलदार तेजश्री कोरे यांच्यामार्फत काळी फीत लावून निवेदन देण्यात आले.
यावेळी कोविड नियमांचे पालन करत सदर निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे कर्मचारी, तसेच भारतीय युवा बेरोजगार मोर्च्यांचे जिल्हा कार्याध्यक्ष मा. सुजित बांगर,बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे वा.ता.भारसाकळे गुरुजी, मा.आनंदा बांगर,छत्रपती क्रांती सेनेचे मा.संतोष भाऊ दामोदर, मा.गुणवंतबांगर , मा.रामा.डी.भारसाकळे, राष्ट्रीय किसान मोर्च्यांचे मा.विलास तायडे, मा. संतोष भारसाकळे उपस्थित होते.