• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

कोरोना रुग्णसेवा समितीतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन

ByND NEWS INIDIA

Apr 27, 2021

गेवराई प्रतिनिधी: सुशील टकले 

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्यभरात रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. महाराष्ट शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी समजून कोरोना रूग्णांसाठी नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या कोरोना रुग्णसेवा समितीच्या वतीने ३० एप्रिल २०२१  रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.           गेवराई शहर व तालुक्यातील कोरोना रूग्णाची सेवा व प्रशासनाला सहाय्य मिळावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, शिक्षक, पत्रकार, प्राध्यापक, व्यापारी व नागरिक यांनी स्थापन केलेल्या कोरोना रूग्ण समितीने आपल्या रुग्ण सेवा  कार्याला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ९ वा. सिंधी भवन येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता टप्प्याटप्प्याने ५-५ रक्तदात्यांना वेळेवर बोलावून शासकीय नियमांचे पालन करून रक्तदान शिबीर घेतले जाणार आहे. या शिबीरात गेवराई तालुक्यातील नागरिक बंधू -भगिनी, युवक – युवतींनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, शिबिरापूर्वी समिती प्रमुख डॉ. अनिल दाभाडे ( ९७६७३३३१० ), समिती सदस्य दादासाहेब घोडके ( ९४०४६५०००० ), प्रशांत घोटणकर ( ९४२२२४०५८४ ), हरिष मंघारमाणी ( ९४० ५८४११११ ), अभिजित काला ( ९३७०७५५५७७ ), शिरीष भोसले ( ९०७५७१११६६ ) यांच्याकडे रक्तदात्यांनी नांव नोंदणी करावी,असे आवाहन कोराना रुग्ण सेवा समितीच्या सुकाणू समितीने केले आहे.