• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अजित पवार साहेब बेलगाव केळगाव येथील भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा.

ByND NEWS INIDIA

Mar 2, 2023

अजित पवार साहेब बेलगाव केळगाव येथील भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा.

 

 

 

केज तालुक्यातील केळगाव बेळगाव येथे मंजूर झालेल्या 125 विहिरी व बारा रस्ते यांची कामे न करताच निधी लाटण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बेलगाव येथील समाजसेवक प्रताप दातार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांना निवेदन दिले असून ते दिनांक 28 फेब्रुवारी पासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत.

आज दिनांक 2 मार्च रोजी या उपोषणाचा तिसरा दिवस असून उपोषण स्थळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, माजी आमदार भीमराव धोंडे,माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यांनी उपोषण स्थळे भेट दिली. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असे उपोषण करते प्रताप दातार यांनी म्हटले आहे.

 

प्रताप दातार ,अमोल भांगे, नितीन दातार ,संध्या भंडारे, रामेश्वर दातार ,अनिकेत पवार, रामेश्वर चौरे, नरसिंग दातार , आनंत जाधव, नवीन कुमार पांचाळ यांच्यासह माहिती अधिकार महासंघाचे कार्यकर्ते आझाद मैदानावर अमरण उपोषणास बसले असून आज उपोषणाचा तिसरा दिवस असल्यामुळे उपोषण कर्त्यांची प्रकृती खळवण्यास सुरवात झाली आहे.