• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

कै.ल.दे.महिला महाविद्यालयात आज ‘रोजगार मेळाव्याचे ‘आयोजन

कै.ल.दे.महिला महाविद्यालयात आज ‘रोजगार मेळाव्याचे ‘आयोजन

परमस्कील औरंगाबाद व कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम

ND NEWS | परळी वैजनाथ

परळी , दि. ०२ मार्च २०२३
येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय व परमस्कील औरंगाबाद


यांच्या संयुक्त विद्यमाने आज कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी 10:30 वाजता रोजगार

मेळाव्याचे ( campus interview and selection ) आयोजन करण्यात आले आहे.

यात पदवी चालू असलेले ,पदवी ,आयटीआय या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यात ए. के . इंजिनियरिंग , कारेगाव ; कल्याणी टेक्नोफोर्स लिमिटेड , धुत ट्रान्समिशन , इंडुरन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड , पुणे व औरंगाबाद या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.तरी या मुलाखतीसाठी परळी व परळी पंचक्रोशीतील बहुतांश विद्यार्थ्यांनी आज उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकातर्फे प्राचार्य डॉ.एल.एस.मुंडे प्लेसमेंट सेलच्या प्रमुख कल्याणकर राजश्री , प्रा. डॉ. वर्षा मुंडे ,प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड , प्रा. शरद रोडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

मुलाखतीला येत असताना विद्यार्थ्यांनी सोबत येताना परीक्षा दिलेल्या शेवटच्या सत्राचा मार्क मेमो आधार कार्ड / पॅन कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स , दोन फोटो घेऊन यावेत. असे संयोजकांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.