• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

 

19 मोटारसायकली चोरणारा अखेर लातूरमध्ये जेरबंद

प्रतिनिधी : मोटारसायकल चोरी करायची आणि मिळेल त्या किंमतीमध्ये विक्री करायची. यामधून लाखो रुपये कमवण्याचा कहर परळी येथील 35 वर्षीय अखिल शेख याने केला होता. केवळ बीड जिल्हाच नव्हे तर मराठवाड्यातील प्रत्येत जिल्ह्यातून शेख याने मोटारसायकलीची चोरी केली होती. एवढेच नाही तर पुण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. यामुळे दुचाकीवाल्यांचे तर नुकसान झालेच पण पोलीस प्रशासनही त्रस्त झाले होते.

मोटारसायकल चोरी करायची आणि मिळेल त्या किंमतीमध्ये विक्री करायची. यामधून लाखो रुपये कमवण्याचा कहर परळी येथील 35 वर्षीय अखिल शेख याने केला होता. केवळ बीड जिल्हाच नव्हे तर मराठवाड्यातील प्रत्येत जिल्ह्यातून शेख याने मोटारसायकलीची चोरी केली होती. एवढेच नाही तर पुण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. यामुळे दुचाकीवाल्यांचे तर नुकसान झालेच पण पोलीस प्रशासनही त्रस्त झाले होते. अखेर लातूर येथील विवेकानंद चौकच्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याला अटक करण्यात आली आहे. चोरीच्या 19 मोटरसायकलसह आरोपीस अटक करुन 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

विवेकानंद चौक येथे लातूर येथे 28 मार्च रोजी एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपासकामासाठी एक पथक रवाना करण्यात आले होते.चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अखिल महबूब शेख याला पोलिसांनी शाम नगर परिसरातून ताब्यात घेतले होते. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी एम. आय.टी. कॉलेज पार्किंगमध्ये लावलेली स्प्लेंडर मोटर सायकल चोरी केल्याचे कबूल केले होते. एवढेच नाही तर यापूर्वी मराठवाडा आणि पुण्यातही मोटारसायकल चोरी केल्याचे त्याने कबूल केले आहे.

येतीलत्या किमतीत  दुचाकीची विक्री

आरोपीकडे सखोल तपास केला असता त्याने लातूर शहर, उदगीर, माळाकोळी, अंबाजोगाई, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, शिक्रापूर, पुणे येथील विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याचे सांगून त्यांने चोरलेल्या मोटारसायकली पैकी 19 मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. मात्र, चोरी केलेल्या मोटारसायकलची कागदपत्रे नसल्याने मिळेल त्या किंमतीमध्ये त्याने विक्री केलेली आहे. त्याच्याकडून 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विवेकानंद चौक येथील पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात हा तपास करण्यात आला आहे.