• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये ;तोडलेले कनेक्शन पूर्ववत करा; शेतकऱ्यांना दीड महिन्याचा कालावधी द्या— प्रा.टी.पी. मुंडे

ByND NEWS INIDIA

Nov 22, 2021

 

परळी वैजनाथ/प्रतिनिधी

     ND NEWS :- महावितरण कंपनीकडून सध्या सगळीकडे गावातील व कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडली जात आहेत .ज्या भागातील शेतकऱ्यांची कनेक्शन तोडली असतील ते पूर्ववत करा शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडू नका शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी द्या अशी मागणी लोकनेते प्रा.टी. पी. मुंडे( सर) यांनी केली आहे.

शेतकऱ्यांचे उसाचे पीक हातात आले आहे उसाच्या पिकाला पाण्याची आवश्यकता असते आणि शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन तोडल्यामुळे त्यांचे हातास आलेले उसाचे पीक संकटात सापडले आहे त्याचे नुकसान होत आहे तसेच कापसाचे पीकही संकटात सापडले आहे.

कापसाचे पीक हातास आले आहे परंतु परळी तालुक्यातील कापूस खरेदी केंद्र मात्र अजून सुरू झालेले नाहीत त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उसाचे पिकाचे पाणी तोडल्यामुळे उसाच्या पिकाच्या वजनात घट होते परिणामी शेतकऱ्याचे नुकसान होते. कोरोना काळ व मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यांचे एकही पिक राहिले नाही त्यांचे पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्याकडे पैसा राहिला नाही.

बिले भरली पाहिजेत यामध्ये कसलेही दुमत नाही परंतु केव्हा आणि कधी भरायची याचा कालावधी असतो शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात आहे त्याच्याकडे पैसे नाहीत. असे चुकीचे धोरण महावितरण कंपनीने शेतकऱ्यावर लादू नये.

या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी संतप्त झालेला आहे शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि महावितरण कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्यास मागेपुढे पाहणार नाही तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी यांना सूचनावजा विनंती असून हे चुकीचे धोरण स्वीकारू नका तसेच होणाऱ्या परिणामांना संपूर्ण महावितरण कार्यालयातील अधिकारी व कंपनी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.

वरील सर्व बाबींचा विचार करून महावितरण कंपनीने तात्काळ विज बिल वसुली थांबवुन शेतकऱ्यांचे तोडलेले कनेक्शन पूर्ववत करावेत आणि शेतकऱ्यांना बिल भरण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.