• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ,घरोघरी दिवे लावुन साजरी करा- नवयुवक मल्हार प्रतीष्ठान लोणी

ByND NEWS INIDIA

May 30, 2021

 

                 ND NEWS :-

या वर्षी राष्ट्रमाता पूण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती साजरी होत आहेत.परन्तु कोरोना संकट यावर्षीही कमी झालेले नाही, त्यामुळे आपण सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनालाही सहकार्य करणे आपले आद्य कर्तव्य ठरते. भारत देशाचे जबाबदार नागरिक व पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे अद्भूत,अद्वितीय, लोकाभिमुख कार्य विचारांना स्मरून, आपण यावर्षीचा जयंती उत्सव घरीच साजरा करणार आहोत.

31मे या सोनियाच्या दिनी आपण सर्वांनी घरी पिवळा झेंडा अभिमानाने फडकवा, अंगणात सडा रांगोळी काढून, परिवारातील सर्व सदस्यांनी घरातच अहिल्या मातेचे प्रतिमा पूजन करून अहिल्या मातेचे महान कार्यास स्मरण करून नतमस्तक व्हावे, संध्याकाळी घरोघरी दिवे लाऊन हा दिवस प्रकाशमय साजरा करावा असे आवाहन नवयुवक मल्हार प्रतीष्ठान लोणी यांनी केले आहे.