• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग(बप्पा) सोनवणे यांच्या हस्ते 4 रुग्णवाहिकेचे लोकार्पण*

ByND NEWS INIDIA

May 29, 2021

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे*

बीड जिल्हा परिषदेच्या वतीने कोरोनावर प्रतिबंध मिळवण्यासाठी जिल्ह्यातील 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात आल्या. त्यापैकी 4 रुग्णवाहिकांचे आज शनिवार दि. 29 मे 2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र युसूफ वडगाव येथे जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

बीड जिल्हा परिषदेच्या वतीने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे काही आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आली होती. या कामासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.धनंजयजी मुंडे साहेब यांना विनंती करण्यात आली होती. व अखेर 7 आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळाल्या.त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांना ने-आण करण्यासाठी मदत होणार आहे.

या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती सदस्य उमाकांत भुसारी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ आठवले, वैद्यकीय अधिकारी डॉ ब्राम्हणे मॅडम, प्रवीण पवार, रूपेश बोरगावकर, अरुण राऊत, चंदू थळकरी,अमोल पाटील,मुकूंद गायकवाड, भैय्या पोटभरे,आकाश गायकवाड व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.