• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*धनंजय मुंडेंचा परळीत सेवाधर्म; कोविडसेवा देणाऱ्या वाहनचालकांना मोफत कोरोना सुरक्षा किट*

ByND NEWS INIDIA

May 14, 2021

परळी (दि. 14) -प्रतिनिधी

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या आणि कोरोनाच्या प्रादुर्भावात नागरिकांना एक आधार म्हणून सुरू असलेल्या सेवाधर्म उपक्रमांतर्गत विविध कोविड मध्ये सेवा देत असलेल्या रिक्षा, रुग्णवाहिका, शववाहिका आदी वाहनांवरील चालकांना मोफत कोरोना सुरक्षा किट वाटप करण्यात आले.

न.प. गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आज परळीतील रुग्णवाहतुक, रुग्णसेवा तसेच नगर परिषदेस कोरोना रुग्णाची अंत्यविधि करण्यासाठी सहकार्य करणारे वाहन चालक यांना कोरोना सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले. यावेळी नागनाथ भाग्यवंत, गणेश काळे, वैजनाथ कासार, शरीफ भाई, मुखतार सेठ, कोयला भाई, सिद्धेश्वर फड, महादेव भोसले, हनुमंत कराड, संतोष गायकवाड, योगेश पिसाळ, जावेद शेख, वैजनाथ खरोडे, नारायण गित्ते, राम पाळवदे यांच्यासह अनेक चालकांना कोरोना सुरक्षा किट देण्यात आले.

यावेळी रा.कॉ. शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, युवक तालुकाअध्यक्ष संतोष शिंदे, संजय गांधी चे चेअरमन राजाभाऊ पौळ, सरचिटणीस अनंत इंगळे, शिक्षक आघाडीचे अध्यक्ष अजय जोशी सर, सचिव आरगड़े सर, युवानेते शंकर कापसे, प्रणव परळीकर, प्रा.अतुल फड, अमर रोडे, युवक सरचिटणीस बळीराम नागरगोजे, माजी नगरसेवक रवि मुळे, राष्ट्रवादी सेवा दल चे रंगनाथ सावजी, गिरिश भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

       दररोज कोरोना प्रादुर्भावात काम करणाऱ्या फ्रंटलाईन लीडरला सदर कोरोना सुरक्षा किट देण्यात येणार आहे या मध्ये मास्क, सॅनिटायझर, पल्स ऑक्सी मीटर, जलनेती पात्र,डेटॉल साबण यासह इतर साहित्य असणार आहे.